अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेच्या (राजिप) आरक्षण सोडत गुरुवार (दि. २८) काढण्यात आली. या सोडतीमध्ये अनेक दिग्गजांचे मतदारसंघ आरक्षित झाल्यामुळे त्यांचे पत्ते कट झाले आहेत. या आरक्षणामुळे कही जण खूश तर काही जण नाराज अशी परिस्थिती आहे.रायगड जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षते खाली गुरुवारी ही सोडत काढण्यात आली. उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के पाटील, तहसीलदार विशाल दौंडकर यांनी त्यांना सहकार्य केले. या सोडतीवेळी राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
रायगड जिल्हा परिषदेचे पूर्वी ५९ मतदार संघ होते ते ६६ झाले आहेत. नव्याने झालेल्या प्रभाग रचनेनुसार गुरुवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. अनुसूचित जाती साठी ३, अनुसूचित जमातीसाठी १०, तर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) १७ जागा आरक्षित करण्यात आल्या. सर्व प्रवर्गातील महिलांसाठी एकूण ५० टक्के म्हणजे ३३ जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. जुन्या प्रभागरचनेनुसार अनुसूचित जातीसाठी २ तर अनुसूचित जमातीसाठी ९ जागा, ओबींसींसाठी १६ जागा राखीव ठेवण्यात आलेल्या होत्या.
पाली देवद, वडघर (पनवेल) , कळंब, पाथरज, उमरोली (कर्जत) , हाळखुर्द , चौक (खालापूर) , राबगाव (सुधागड), शिहू (पेण) , जासई(उरण), कामार्ले, चेंढरे (अलिबाग), धाटाव, (रोहा), निजामपूर, मोर्बा (माणगाव), पाभरे, वरवठणे (म्हसळा), करंजाडी (महाड), लोहारे(पोलादपूर) हे मतदारसंघ खुले आहेत. महिलांसाठी राखीव असलेल्या ३३ जागांमध्ये अनुसूचीत जाती महिलांसाठी २, अनुसूचित जमाती महिलांसाठी ५, ओबीसी महिलांसाठी ९, खुल्या प्र्वातील महिलांसाठी १७ जागांचा समावेश आहे.
राजिप मतदारसंघांचे तालुका निहाय आरक्षण
पनवेल : १- वावंजे – ना मा प्रवर्ग (महिला) २ – नेरे – ना मा प्रवर्ग ३ – पालीदेवद – सर्वसाधारण ४ – विचुंबे – अनु जाती (महिला) 5 – वावेघर – अनु जमाती ६ – पळस्पे – अनु जमाती ७ वडघर – सर्वसाधारण ८ – गव्हाण -ना मा प्रवर्ग (महिला) ९ – केळवणे – ना मा प्रवर्ग (महिला) कर्जत : १० – कळंब – सर्वसाधारण ११- पाथरज – सर्वसाधारण १२ – उमरोली – सर्वसाधारण १३ – नेरळ – ना मा प्रवर्ग १४ – सावेळे – सर्वसाधारण (महिला) १५ – बीड बुद्रुक – सर्वसाधारण (महिला) खालापूर : १६ – हाळखुर्द – सर्वसाधारण १७ – चौक – सर्वसाधारण १८ – रिस – अनु जाती १९ – सावरोली -ना मा प्रवर्ग (महिला) २० – आत्करगाव – सर्वसाधारण (महिला) सुधागड : २१ – जांभूळपाडा सर्वसाधारण (महिला) २२ राबगाव – सर्वसाधारण पेण: २३ जिते सर्वसाधारण (महिला) २४ – दादर – सर्वसाधारण (महिला) २५ – वढाव -सर्वसाधारण (महिला) २६ – वडखळ – सर्वसाधारण (महिला) २७- पाबळ – ना मा प्रवर्ग (महिला) २८ – शिहू – सर्वसाधारण उरण २९ – जासई – सर्वसाधारण ३० – चिरनेर – अनु जमाती ३१- नवघर – सर्वसाधरण ( महिला) ३२ – चाणजे – अनु जाती (महिला) ३३ – बांधपाडा – ना मा प्रवर्ग अलिबाग ३४ शहापूर – अनु जमाती ३५ – कुर्डुस -ना मा प्रवर्ग (महिला) ३६ – कामाला – सर्वसाधारण ३७ – मापगाव – ना मा प्रवर्ग ३८- थळ – ना मा प्रवर्ग ३९- चेंढरे – सर्वसाधारण ४० – चौल सर्वसाधारण (महिला) ४१ – बेलोशी – ना मा प्रवर्ग (महिला) मुरूड ४२ – उसरोली – सर्वसाधारण (महिला) ४३ – राजपूरी -ना मा प्रवर्ग रोहा ४४- नागोठणे सर्वसाधारण (महिला) ४५ – आंबेवाडी -सर्वसाधारण (महिला) ४६ – निडी त. अष्टमी -सर्वसाधारण (महिला) ४७ – वरसे – अनु जमाती (महिला) ४८ – धाटाव – सर्वसाधारण तळा : ४९ – महागाव – ना म प्रा ५०- मांदाड – अनु जमाती (महिला) माणगाव ५१ – तळाशेत – अनु जमाती (महिला) ५२ – निजामपूर -सर्वसाधारण ५३ – लोणेरे – अनु जमाती (महिला) ५४ – मोर्बा -सर्वसाधारण ५५- गोरेगाव सर्वसाधारण (महिला) म्हसळा ५६- पाभरे -सर्वसाधारण ५७ – वरवठणे -सर्वसाधारण श्रीवर्धन ५८ – बोर्लीपंचतन – ना म प्रा ५९ – बागमांडला – ना मा प्रवर्ग (महिला) महाड ६० – बिरवाडी – अनु जमाती ६१ – वरध सर्वसाधारण (महिला) ६२ – नाते – अनु जमाती (महिला) ६३ – वहूर – ना मा प्रवर्ग (महिला) ६४ – कंरजाडी – सर्वसाधारण पोलादपूर ६५ – देवळे – सर्वसाधारण (महिला) ६६ – लोहारे – सर्वसाधारण