शिंदे गटाचे महाडचे आमदार भरत गोगावले हे रायगडच्या पालकमंत्री पदाची आस लावून बसले होते. बुधवारी राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची जाहीर केलेल्या सुधारीत यादीतही भरत गोगावले यांना स्थान मिळालं नाही. महायुतीत असलेल्या सरकारमध्ये रायगडच्या पालकमंत्री पदासाठी दोन नावे स्पर्धेत आहेत. राष्ट्रवादी आणि शिंदे गटात या पदासाठी रस्सीखेच सुरू असल्याने नव्याने जाहीर झालेल्या पालकमंत्र्यांमध्ये रायगडचा अधिकृत पालकमंत्री जाहीर करण्यात आलेला नाही. याबाबत महाडचे आमदार भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची यादी जाहीर असली, तर ज्या रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिंदे गट आणि अजित पवार गटात सर्वाधिक संघर्ष पाहायला मिळाला त्याचा निर्णय या यादीत घेण्यात आलेला नाही. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा अतिरिक्त भार सध्या शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांच्याकडेच आहे.

Yogesh Kadam On Sanjay Shirsat :
Yogesh Kadam : शिवसेनेच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली? “संजय शिरसाट काय म्हणतात त्याला महायुतीत महत्त्व नाही”, योगेश कदमांचं विधान
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Chhagan Bhujbal
“तेलगी प्रकरणात माझं…”, दोन दशकानंतर भुजबळांनी मनातली खदखद व्यक्त केली; मंत्रिपदाच्या राजीनाम्याबद्दल म्हणाले…
Ravindr Dhangkar on Shiv sena :
Ravindr Dhangkar : माजी आमदार रविंद्र धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार? स्पष्टीकरण देत म्हणाले, “मी काँग्रेस पक्षात…”
Santosh Deshmukh murder case Ajit Pawar again consoles Dhananjay Munde  Mumbai news
पुरावे असल्याशिवाय कोणतीही कारवाई नाही; अजित पवारांचा धनंजय मुंडेंना पुन्हा दिलासा
Aniket Tatkare
अनिकेत तटकरेंकडून एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा ‘गद्दारांचा बादशाह’ असा उल्लेख, महायुतीत जुंपली; मंत्र्याकडून राजीनाम्याची तयारी
Bharatshet Gogawale On Sunil Tatkare
Bharatshet Gogawale : पालकमंत्रिपदाचा वाद विकोपाला? “…तर मंत्रिपदाचा राजीनामा देतो”, भरत गोगावलेंचं सुनील तटकरेंना खुलं आव्हान
Ekanth Shinde
Eknath Shinde : “आज बाळासाहेब असते तर त्यांनी…”, विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली भावना

हेही वाचा >> शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर, वाचा…

याबाबत भरत गोगावले म्हणाले की, “सध्या रायगडचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांच्याकडे आहे. म्हणजे ते आमच्याकडेच आहे. त्यामुळे काही अडचण नाही. आमची वर्णी लागेत नाही तोवर ते पद त्यांच्याकडेच राहील”, असंही ते पुढे म्हणाले.

दरम्यान, रायगडच्या पालकमंत्री पदी तुमची वर्णी लागेल का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, “पालकमंत्री पदासाठी आमची धावपळ तर सुरू आहे. योग्यवेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील. मी मंत्रीच झालो नाहीय तर पालकमंत्री कसा होणार?”

भरत गोगावलेंचं पालकमंत्री पद पुन्हा हुकलं

महाविकास आघाडी सरकारच्या काळापासूनच भरत गोगावले पालकमंत्री पदाची आस लावून बसले होते. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर मविाआचं मंत्रिमंडळ बरखास्त झालं अन् नव्याने मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आलं. एकनाथ शिंदे आणि भाजपा सरकारने पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार केला. या पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात भरत गोगावलेंना संधी मिळाली नाही. दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना संधी दिली जाईल, असं आश्वासन सरकारकडून देण्यात आलं. कालांतराने, जून महिन्यात अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड करून सरकारला पाठिंबा दिला. त्यांच्यासोबत आलेल्या आठ आमदारांसह दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार झाला. परंतु, या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारातही भरत गोगावलेंची वर्णी लागली नाही. परंतु, मंत्रिमंडळात मला नक्की स्थान देतील, असा विश्वास भरत गोगावलेंनी कायम बोलून दाखवला आहे.

दरम्यान, आज १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी अजित पवार गटाच्या आमदार आणि मंत्री आदिती तटकरे आणि शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांच्या रस्सीखेच सुरू आहे. या जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळावं म्हणून भरत गोगावलेंनी प्रचंड प्रयत्न केले आहेत. परंतु, त्यांचा मंत्रिमंडळात समावेश नसल्याने पालकमंत्री पदासाठी विलंब होत असल्याची चर्चा आहे. तसंच, येत्या घटस्थापनेपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळात तरी भरत गोगावलेंनी मंत्रिपद मिळतंय का हे पाहावं लागणार आहे.

तिसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबात भरत गोगावले म्हणाले की, “नवरात्रीत देवीच्या मनात असेल तर मंत्रिमंडळात स्थान मिळेल.”

Story img Loader