मुंबई-लातूर रेल्वे नांदेडपर्यंत नेण्याच्या रेल्वेमंत्र्यांच्या घोषणेच्या विरोधात रेल्वे बचाव संघर्ष समितीतर्फे शनिवारी रेल्वेस्थानकात पंढरपूर-निजामाबाद रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले. तब्बल अर्धा तास ही रेल्वे अडविण्यात आली. रेल्वेस्थानकाला या वेळी पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
रेल्वे बचाव संघर्ष समिती, सर्वपक्षीय, व्यापारी महासंघाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. पंढरपूर-निजामाबाद रेल्वे दुपारी १२ वाजता येथील रेल्वेस्थानकात आली. या वेळी तब्बल अर्धा तास ती अडविण्यात आली. या वेळी रेल्वेमंत्र्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. आमदार वैजनाथ शिंदे, उपमहापौर सुरेश पवार, अॅड. समद पटेल, अशोक गोविंदपूरकर, पप्पू कुलकर्णी, प्रदीप पाटील, नगरसेवक चंद्रकांत चिकटे, राहुल माकणीकर, सुनील गायकवाड यांच्यासह महिला मोठय़ा संख्येने या आंदोलनात सहभागी झाल्या. रेल्वे बचाव संघर्ष समितीच्या वतीने रेल्वे अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा रेल्वे रोको करण्यात येईल, असा इशारा निवेदनात दिला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा