वसई : विरार येथे राहणार्‍या एका रेल्वे कर्मचार्‍याने स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. शनिवारी (१८ जून) रात्री ही घटना घडली. नितीश चौरसिया असे या कर्मचार्‍याचे नाव आहे. मागील ९ वर्षांपासून त्याच्यावर मानसिक उपचार सुरू होते.

नितीश चौरसिया (३८) पश्चिम रेल्वेत अभियंता म्हणून कार्यरत होते. ते विवाहित असून त्यांना दोन मुली आहेत. शनिवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास त्यांनी आपल्या सर्व्हिस रिवॉल्वरमधून स्वत:वर गोळी झाडली. त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण तेथे जाण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा : धक्कादायक! पंकजा मुंडेंना उमेदवारी न दिल्याने समर्थकाचा आत्महत्येचा प्रयत्न

चौरसिया यांच्यावर मागील ९ वर्षांपासून मानसिक उपचार सुरू होते. त्यांच्या मनात सतत आत्महत्येचे विचार येत होते. त्याच नैराश्याच्या भरात त्यांनी आत्महत्या केली, अशी माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली.

Story img Loader