मध्य रेल्वेच्या मिरज स्थानकावर रविवारी पहाटे मालगाडीचे इंजिन रुळावरुन घसरल्याने अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही.
मालधक्क्यावरुन रेल्वे प्लॅटफार्मवर असणाऱ्या मालगाडीला जोडण्यासाठी रेल्वे इंजिन येत असताना रुळ बदलीच्या वेळी रुळावरुन घसरले. हा प्रकार स्थानकापासून दीड कि.मी. अंतरावर घडला. तीन तासांच्या प्रयत्नानंतर इंजिन सुस्थितीत करण्यात कर्मचाऱ्यांना यश आले. 

Story img Loader