कोयना पाणलोटक्षेत्रात सलग तिसऱ्या दिवशी दमदार पाऊस कोसळत आहे. तर, धरणाखालील कृष्णा, कोयना नद्यांकाठी पावसाची रिपरिप कायम असल्याने खरीप हंगामाला जीवदान मिळण्याची शक्यता घट्ट झाली आहे. गेल्या ३६ तासात कोयना पाणलोट क्षेत्रात १०१.६६ मि. मी. पाऊस झाला आहे. कोयना धरणात पाण्याची आवक वाढू लागली आहे. गेल्या ३६ तासात कोयना पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर विभागात ८८ (७७५), नवजा विभागात १०३ (९२१) तर, महबळेश्वर विभागात ९९ (५५३) मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात पाऊस कोसळत असल्याची आकडेवारी असून, त्यात आज दिवसभरात पाटण तालुक्यातील पाथरपुंज येथे ५० एकूण १,३७२ मि. मी. इतका सर्वाधिक पाऊस झाला आहे. पाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्य़ातील गगनबावडा विभागात ५२ एकूण १,१२८ मि. मी. पाऊस नोंदला गेला आहे. कोयना धरणाची पाणीपातळी २,०३८.८ फूट असून, पाणीसाठा १३.७३ टीएमसी म्हणजेच १३ टक्के आहे. पैकी उपयुक्त पाणीसाठा ८.६१ टीएमसी म्हणजेच ८.१८ टक्के आहे. हा पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत जवळपास ६० टीएमसीने कमी आहे.
कोयना धरण क्षेत्रात पाऊस कायम
कोयना पाणलोटक्षेत्रात सलग तिसऱ्या दिवशी दमदार पाऊस कोसळत आहे. तर, धरणाखालील कृष्णा, कोयना नद्यांकाठी पावसाची रिपरिप कायम असल्याने खरीप हंगामाला जीवदान मिळण्याची शक्यता घट्ट झाली आहे.

First published on: 14-07-2014 at 02:57 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain continues in koyna dam area