गेले काही दिवस उन्हाचा कडाका सहन करणाऱ्या कळंब तालुक्यास बुधवारी अवकाळी पावसाने झोडपले. वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसला. कोथळा शिवारात दुपारी तीनच्या सुमारास शेळ्या राखणाऱ्या रामभाऊ सिरसट (वय ४२) यांच्यासह त्यांच्या ११ शेळ्या ठार झाल्या, तर सोबत असलेल्या दोन लहान मुलीही जखमी झाल्या.
कळंब शहर, िहगणगाव, कोथळा, अंदोरा, कोठाळवाडी आदी परिसरात पावसाने दुपारी वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यामुळे ग्रामीण भागात पत्र्याची घरे असलेले ग्रामस्थ घाबरून गेले. कोथळा येथील रहिवासी रामभाऊ संभाजी सिरसट (वय ४२) व अन्य दोन शाळकरी मुली िहगणगाव-दाभा शिवारात शेळ्या राखत होत्या. दुपारी अचानक पाऊस सुरू झाला. या वेळी वीज पडून सिरसट जागीच ठार झाले, तर त्यांच्यासोबत असणाऱ्या अंबिका लहू ठोंबरे (वय १३) व अंकिता लहू ठोंबरे (वय ९) या दोन शाळकरी मुली जखमी झाल्या. ११ शेळ्या मृत्युमुखी पडल्या. जखमी दोन्ही मुलींना पुढील उपचारांसाठी लातूरला पाठविले. माहिती मिळताच तहसीलदार वैशाली पाटील, नायब तहसीलदार सुनील कावरखे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. घटनेचा पंचनामा करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा