राज्यात सध्या काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी उष्णतेची लाट असे परस्परविरोधी वातावरण आहे. हवामान खात्याने सांगितल्यानुसार पुढील पाच दिवसांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस तर विदर्भाच्या काही भागात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>> ‘काश्मिरी पंडितांवरील अत्याचार थांबवा,’ मुंबईत रझा अकादमीची निदर्शने
मराठवाड्यात ४ जून रोजी तुरळक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस झाला. या पावसामुळे तापमानात घट झाली असून येथे काही भागांत ढगाळ वातावरण आहे. मुंबई तसेच उपनगरातही मान्सूनपूर्व सरी बसरल्या आहेत. तर विदर्भामध्ये अजूनही पारा चढलेलाच असून येथील नागरिकांना अद्याप पासवाची प्रतीक्षा आहे.
हेही वाचा >>> राजू शेट्टींकडून नितीन गडकरींवर स्तुतीसुमने, शरद पवारांवर मात्र सडकून टीका, म्हणाले “…बांडगुळांना पोसण्याचे काम केले”
अरबी समुद्राच्या बाजूने २९ मे रोजी केरळात आणि त्यानंतर ३१ मे रोजी कर्नाटकात प्रगती करून कारवारपर्यंत दाखल झालेल्या मोसमी पावसाचा प्रवास सध्या संथ गतीने सुरू आहे. गोव्याच्या जवळ तो पोहोचला असला, तरी पोषक वातावरण नसल्याने त्याची पुढे प्रगती थांबली आहे. अरबी समुद्रातील शाखेने गेल्या चार दिवसांपासून आगेकूच केली नाही. बंगालच्या उपसागरातील मोसमी पावसाच्या शाखेने ३ जूनला मोठी प्रगती करीत पूर्वोत्तर राज्यांसह हिमालयाच्या पायथ्यापर्यंत प्रगती केली. मात्र, शनिवारी (४ जून) याही भागातून मोसमी पावसाची प्रगती थांबली होती. याच कारणामुळे मुंबईमध्ये अद्याप मान्सून दाखल झालेला नाही.
हेही वाचा >>> “ईडी आता पंडित नेहरूंनाच नोटीस बजावून…”, संजय राऊतांचं ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणी टीकास्त्र!
यावर्षी पाऊस किती होणार?
सध्याची हवामानाची स्थिती लक्षात यंदा सरासरीच्या १०३ टक्के पाऊस होण्याची शक्ता आहे. त्यात चार टक्के कमी-अधिक होण्याची शक्यताही गृहीत धरण्यात आली आहे. १९७१ ते २०२० या कालावधीत भारतात पावसाची दीर्घकालीन सरासरी ८७ सेमी आहे. या सरासरीच्या तुलनेत मोसमाच्या चार महिन्यांत १०३ टक्के पाऊस देशात पडणार आहे.