नगर शहर व परिसरात सोमवारी सलग चौथ्या दिवशी दमदार पावसाने हजेरी लावली. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मुसळधार स्वरूपात सुरू झालेला पाऊस रात्री साडेआठपर्यंत सुरू होता. त्यानंतरही हलक्या सरी येतच होत्या. अधूनमधून पावसाचा वेग कमी-जास्त होत होता. परंतु पाऊस सुरू होतानाच वादळी वारे वाहिल्याने शहरातील मोठय़ा भागाचा वीजपुरवठा खंडित झाला होता. तो रात्री उशिरापर्यंत सुरू झाला नव्हता.
शहरासह जिल्ह्य़ाच्या ब-याच भागात गेल्या तीन-चार दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू असल्याने शेतक-यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र हा पाऊस पुरेसा नसला तरी पोषक वातावरण तयार झाल्याने रब्बी पिकांच्या आशा वाढल्या आहेत. पारनेर, शेवगाव तालुक्यात काही ठिकाणी स्थानिक नद्या, नाले व ओढेही वाहिल्याने तेवढय़ा भागापुरती पाण्याची चिंता काहीशी कमी होण्यास मदत होईल.
नगर परिसरात पाऊस
नगर शहर व परिसरात सोमवारी सलग चौथ्या दिवशी दमदार पावसाने हजेरी लावली.
Written by अपर्णा देगावकर
First published on: 08-09-2015 at 03:00 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain in nagar area