जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असून गेल्या २४ तासांत १२.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणात आज अखेर ७८ टीएमसी पाणी साठा झाला आहे. तारळी, उरमोडी, कण्हेर, बलकवडी व वीर धरणातून पाणी सोडण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच आहे. हे प्रमाण गतवर्षीच्या प्रमाणात कमी असले तरी समाधानकारक आहे. पाणलोट क्षेत्रात २ ऑगस्टपर्यंत एकूण पडलेला पाऊस – धोम – ४७१ मि मि, कण्हेर – ५१७ मि मि, कोयना – ३२०८ मि मि, धोम बलकवडी – १९४८ मि मि, उरमोडी – ९०३ मि मि, तारळी – ११७१ मि मि.
धोम बलकवडी धरणात उपयुक्त पाणी साठय़ाची क्षमता ३.९६ टीएमसी असून आज रोजी पाणी साठा ३.४१ टीएमसी इतका आहे. तारळे धरणाची उपयुक्त पाणी साठय़ाची क्षमता ५.८४ टीएम सी असून आज रोजी पाणी साठा ४.८९ टीएमसी इतका आहे. तर कोयना धरणाची उपयुक्त पाणी साठय़ाची क्षमता १०० टीएमसी असून आज रोजी पाणी साठा ७४ टीएमसी इतका आहे.
साताऱ्यात १२.१ मिलिमीटर पावसाची नोंद
जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असून गेल्या २४ तासांत १२.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणात आज अखेर ७८ टीएमसी पाणी साठा झाला आहे. तारळी, उरमोडी, कण्हेर, बलकवडी व वीर धरणातून पाणी सोडण्यात आलेले आहे.
First published on: 04-08-2014 at 02:20 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain in satara