जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असून गेल्या २४ तासांत १२.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणात आज अखेर ७८ टीएमसी पाणी साठा झाला आहे. तारळी, उरमोडी, कण्हेर, बलकवडी व वीर धरणातून पाणी सोडण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच आहे. हे प्रमाण गतवर्षीच्या प्रमाणात कमी असले तरी समाधानकारक आहे. पाणलोट क्षेत्रात २ ऑगस्टपर्यंत एकूण पडलेला पाऊस – धोम – ४७१ मि मि, कण्हेर – ५१७ मि मि, कोयना – ३२०८ मि मि, धोम बलकवडी – १९४८ मि मि, उरमोडी – ९०३ मि मि, तारळी – ११७१ मि मि.
धोम बलकवडी धरणात उपयुक्त पाणी साठय़ाची क्षमता ३.९६ टीएमसी असून आज रोजी पाणी साठा ३.४१ टीएमसी इतका आहे. तारळे धरणाची उपयुक्त पाणी साठय़ाची क्षमता ५.८४ टीएम सी असून आज रोजी पाणी साठा ४.८९ टीएमसी इतका आहे. तर कोयना धरणाची उपयुक्त पाणी साठय़ाची क्षमता १०० टीएमसी असून आज रोजी पाणी साठा ७४ टीएमसी इतका आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा