कर्जत : कर्जत तालुक्यामध्ये आज सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. या पावसामुळे कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील तात्यासाहेब सुद्रिक यांच्या राहत्या घरावर व घराजवळील नारळाच्या झाडावर वीज कोसळली. यामुळे घरावर ज्या भागावर वीज कोसळली त्या घराच्या भागाचा परिसर व छताचा काही भाग खाली पडला. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. प्रचंड जोरदार आवाजासह ही वीज खाली पडली. त्यामुळे घरातील सर्वजण घाबरले होते. झाडावर वीज पडल्यामुळे नारळाचे झाड देखील जळाले आहे.

रस्त्यावर झाड पडले

कर्जत करमाळा रोडवर धांडेवाडी येथे वादळी वाऱ्याने झाड उन्हाळून रस्त्यावर पडली यामुळे वाहतूकही ठप्प झाली होती. काही वेळाने रस्त्यावरील झाड दूर केल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे.

आणखी वाचा-महाराष्ट्र निवडणुकीत तुम्हीही मतदानासाठी पात्र आहात? मग ‘हे’ तीन अ‍ॅप तुमच्याकडे असलेच पाहिजेत; निवडणूक आयोगानं दिली माहिती!

वादळी वाऱ्यासह पाऊस

कर्जत तालुक्यामध्ये ठीक ठिकाणी आज सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. प्रचंड जोरदार चे वारे सुटल्यामुळे याचप्रमाणे विजेचा कडकडाट व ढगांचा गडगडात यासह शहर व तालुक्यात पाऊस पडला आहे.

Story img Loader