मुसळधार पावसामुळे शेकडो खेड्यातील दळणवळण ठप्प पडले आहे. दरम्यान, पुरात वाहून गेलेल्या दोघांपैकी एकाचा मृतदेह सापडला आहे. पुलगाव, बरानदा मार्गावरील नाल्याला आलेल्या पुरात प्रणय पुंडलिक जगताप (वय-१४) व आदित्य संजय शिंदे (वय-१५) ही मुलं वाहून गेली. यापैकी प्रणयचा मृतदेहच हाती लागला, आदित्यच शोध घेणे सुरू आहे.

आर्वी तालुक्यातील बाकडी नदीला पूर आल्याने आर्वी कौडण्यापूर या राज्य मार्गाची वाहतूक ठप्प पडल्याची माहिती तहसीलदार चव्हाण यांनी दिली, सर्वत्रच मुसळधार झाल्याने गाव पानधन रस्ते बंद पडले आहेत.

संकटात सापडलेल्या सर्व गावांना मदत देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू –

आर्वी ते शिरपूर, वाई ते रोहना, कासारखेड ते माजरा, शिरसगाव ते रासुलाबाद तसेच छोट्या नाल्यांना पूर आल्याने सुमारे ७० गावांचा संपर्क तुटला आहे. वर्धा, यशोदा, भराडी, लेंडी नाला, बकली नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. संकटात सापडलेल्या सर्व गावांना मदत देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून पुरात सापडलेल्या गावकऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांनी सांगितले.

Story img Loader