सांगली/नाशिक : सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागाला गुरुवारी सायंकाळी पावसाने झोडपले. यामुळे रब्बी ज्वारीला लाभ होणार असला तरी द्राक्ष, डाळिंबाला फटका बसणार आहे. गेल्या चार दिवसांपासून ढगाळ हवामान असून थंडीही गायब झाली आहे. तसेच नाशिक जिल्हा परिसरात गुरूवारी अनेक ठिकाणी पहाटेच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> नंदुरबार : घरासाठी केलेल्या पाण्याच्या टाकीत पडून दोन मुलांचा मृत्यू

सांगलीत दिवसाचे तापमान ३१ अंश सेल्सियसपर्यंत होते, तर किमान तपमान २९ अंश सेल्सियस होते. गेल्या चार दिवसांपासून ढगाळ हवामान आणि पावसाचे वातावरण तयार झाले होते. दुपारच्या तीव्र उष्म्यानंतर सायंकाळी जत, कवठेमहांकाळ आणि मिरज पूर्व भागात अर्धा तास दमदार पाऊस झाला. पावसाने रानात पाणी साचले, तर कोळपणी झालेल्या शाळू पिकातही पाणी साचले. यामुळे शाळू पिकाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, या भागात द्राक्ष पिके वेगवेगळ्या टप्प्यात आहेत. काही बागा फुलोऱ्यात तर काही बागातील माल काढणीला आला आहे. अशा अवस्थेत पाऊस झाल्याने तयार माल तडकण्याची भीती आहे.

नाशिक जिल्ह्यात पिकांचे नुकसान

पावसाने रब्बी हंगामातील कांदा रोप, कांदा पिके , गहू ,हरबरा ,द्राक्ष आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले . लाल कांदा व इतर पिकांच्या उत्पादनावर विपरित परिणाम होईल. याबाबत प्रशासनाकडून पंचनाम्याचे आदेश देण्यात आले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rains lashed sangli and nashik damaged rabi season crops zws