सांगली : दिवाळीच्या सुट्टीनंतर सांगली मार्केट यार्डमध्ये पहिल्यांच बेदाण्याच्या सौदा मध्ये १८० रुपये प्रति किलो भाव मिळाला. त्यावेळी ३५ गाडी ३५० टन बेदाण्याची आवक झाली होती.
दिवाळी सुट्टीनंतर तब्बल एक महिन्यानंतर सांगली मार्केट यार्ड मध्ये बुधवारी सुरू झाले. त्यावेळी १६ दुकानांमध्ये तब्बल ३५ गाडी (३५०टन) बेदाण्याची आवक होती. त्यावेळी पप्पू मजलेकर यांच्या दुकानात ३६ बॉक्सला १८० रुपये इतका उच्चंकी भाव मिळाला तो माल उमिया एंटरप्रायजेस यांनी खरेदी केला. पहिल्याच सौदा मध्ये व्यापाऱ्यांच्यात मोठा उत्साह होता. त्यावेळी चांगला मला १३० ते १८० रुपये, मध्यम बेदाणे १०० ते १२० रुपये तर काळा बेदाणे ४० ते ८० रुपये प्रति किलो भाव मिळाला.
आणखी वाचा-सांगली : घरफोड्या करणारी टोळी गजाआड, १९ लाखाचा ऐवज हस्तगत
त्यावेळी मनीष मालू, पवन चौगुले, अरुण शेडबाळे, अभिजीत पाटील, वृषभ शेडबाळे, इम्तियाज तांबोळी अश्विन पटेल, रवी पाटील, राजाभाई पटेल, सोमनाथ मनोली, कृष्णा मर्दा, नितीन अट्टल, हरीश पाटील, विनीत गड्डे, प्रवीण यादवडे, रुपेश पारेख, गगन अग्रवाल, दगडू कचरे, प्रशांत भोसले, अजित पाटील, अनिल पाटील, विनोद कबाडे, गिरीश मालु, देवेंद्र करे आदी सह व्यापारी उपस्थित होते.
त्यावेळी मार्केट कमिटी सभापती सुजय शिंदे व सचिव महेश चव्हाण म्हणाले सांगली मार्केट मध्ये बेदाण्याची आवक वाढत असून खुल्या सौदा मध्ये शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सांगली मार्केट यार्ड मध्ये विविध शेतीमध्ये विक्रीसाठी आणावा असे आवाहन केले.