सांगली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा दोषमुक्ती अर्ज शुक्रवारी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने नामंजूर केला. शिराळा तालुक्यातील शेंडगेवाडी येथे २००८ मध्ये मनसेचे आंदोलन झाले होते. यावेळी दगडफेकही झाली. सरकार पक्षाच्यावतीने याप्रकरणी ठाकरे, मनसे जिल्हा प्रमुख तानाजी सावंत व अन्य यांच्याविरुध्द कोकरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी शिराळा न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा >>> “…तर भाजपाच्या आसुरी सत्ताकांक्षेला रोखू शकतो” सुषमा अंधारेंचं पुण्यात सूचक विधान
दरम्यान, ठाकरे यांचा या घटनेत प्रत्यक्ष सहभाग नसल्याने त्यांना दोषमुक्त करण्याची विनंती वकिलामार्फत इस्लामपूरमधील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात करण्यात आली. सरकारी वकिल राजेश पाटील यांनी युक्तीवाद करीत असताना अद्याप साक्षीदारांचे जबाब नोंदविले नाहीत असे सांगत दोषमुक्तीला विरोध दर्शवला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून ठाकरे यांची दोषमुक्त करण्याची विनंती अमान्य केली.