Raj Thackeray : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा अद्याप झालेली नसली, तरी सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्यानुसार मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा अॅक्शन मोडमध्ये आहेत. राज ठाकरे यांनी त्यांचा महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. ते आज सोलापूरमध्ये आहेत. दरम्यान आज सोलापूरमध्ये असताना त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी दोन उमेदवारांची घोषणा केली आहे.

शिवडी आणि पंढरपूर मनसेचे उमेदवार जाहीर

मनसेने शिवडी आणि पंढरपूर या दोन मतदारसंघांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. शिवडी मतदारसंघातून मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर पंढरपूर मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

अरविंद केजरीवाल आणि 'आप'ला रोखण्यासाठी भाजपाची मतदारांना कोणती आश्वासनं? (फोटो सौजन्य पीटीआय)
अरविंद केजरीवाल आणि ‘आप’ला रोखण्यासाठी भाजपाची मतदारांना कोणती आश्वासनं?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
स्मृती इराणी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवणार? केजरीवालांना शह देण्यासाठी भाजपाचा प्लान काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
Delhi Elections 2025 : स्मृती इराणी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवणार? केजरीवालांना शह देण्यासाठी भाजपाचा प्लान काय?
Image Of MVA
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या स्वबळाच्या भूमिकेमागे नेमकी कारणं काय?
Image Of MVA Leaders
MVA : “महाविकास आघाडी उद्ध्वस्त होतेय, जनतेने त्यांना हाकलून दिले”, ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा; अजित पवार गटाचा टोला
Supriya Sule
Supriya Sule : महापालिका निवडणुकीबाबतच्या ठाकरे गटाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंचं रोखठोक मत; म्हणाल्या, “या निवडणुका…”
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
Uddhav Thackeray and Jitendra Awhad
Jitendra Awhad : “शेवटी कोणालातरी…”, पालिकेच्या निवडणुकीत ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया!

हेही वाचा – Raj Thackeray : “…तेव्हा काही गोष्टी कायमस्वरुपी त्यांच्या लक्षात राहतील”; ‘मॅच फिक्सिंगचं राजकारण करतात’ म्हणणाऱ्या संजय राऊतांना राज ठाकरेंचं प्रत्युत्तर!

उमेदवारी नंतर बाळा नांदगावकरांची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी माधमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे आभार मानले. राज ठाकरे यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे. मला पुन्हा एकदा शिवडी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. मला खात्री आहे की शिवडी मतदारसंघातील लोक मला यंदा नक्कीच विधानसभेत पाठवतील, अशी प्रतिक्रिया बाळा नांदगावकर यांनी दिली.

उमेदवारी मिळताच दिली धोत्रे म्हणाले…

याशिवाय मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी प्रतिक्रिया दिली. पंढरपूर मतदारसंघातून मनसेने मला उमेदवारी दिली आहे. माझ्यापुढे कोणाचं आव्हान नाही. कारण जनता ही काम करणाऱ्यांच्या पाठिशी उभी राहते. महायुती असू द्या किंवा महाविकास आघाडी असू द्या, दोन्ही पक्ष काम करत नाहीत, हे येथील जनतेला माहिती आहे. त्यामुळे पंढरपूरमधील जनता मनसेच्या पाठिशी असल्याचा विश्वास आम्हाला आहे, असे ते म्हणाले.

हेही वाचा – Raj Thackeray : “महाराष्ट्रात मणिपूरसारखी परिस्थिती करायला शरद पवारांनी हातभार लावू नये”, राज ठाकरेंची खोचक टीका!

राज ठाकरे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर

दरम्यान, राज ठाकरे हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून ते राज्यातील विविध मतदारसंघांचा आढावा घेत आहेत. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत २२५ ते २५० जागा लढवणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता सध्या राज ठाकरेंकडून या जागांसाठी उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. त्यापैकी दोन ठिकाणी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.

Story img Loader