महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांची पुन्हा एकदा अध्यक्षपदी निवड झाली आहे. आज मनसेची पक्षांतर्गत निवडणूक पार पडली. या निवडणुकीत राज ठाकरेंची पक्षाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“सन २०२३ ते २०२८ या दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष म्हणून राज ठाकरेंची केंद्रीय निवडणूक समितीने घोषणा केली आहे आणि अभिनंदनाचा ठराव मंजूर केला आहे”, असं पक्षांतर्गत निवडणूक समितीने स्पष्ट केलं.

तर बाळा नांदगावकर यांनीही यासंदर्भातील माहिती दिली. ते म्हणाले, “आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची पक्षांतर्गत निवडणूक झाली. या पक्षाचे अध्यक्ष म्हणून राज ठाकरेंची नेमणूक करावी असा ठराव मी, बाळा नांदगावकर यांनी मांडला. याला नितीन सरदेसाई यांनी अनुमोदन दिलं. एकमताने राज ठाकरेंची नेमणूक झाली आहे. त्यांच्या अभिनंदनाचा ठरावही मंजूर करण्यात आला आहे.”

सविस्तर बातमी अपडेट होत आहे