पुण्यात डिसेंबर महिन्यात ‘महाराष्ट्र केसरी स्पर्धे’चं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेवरून सध्या भाजपाचे खासदार, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस आणि माजी सचिव बाळासाहेब लांडगे यांच्यात वाद रंगला आहे. त्यातच या स्पर्धेसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना आव्हान देणारे भाजपा खासदार बृजभूषण सिंह महाराष्ट्रात येणार आहेत. त्यामुळे राजकीय फड रंगण्याची चिन्ह दिसत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी २० ते २५ डिसेंबरदरम्यान पुण्यात ‘महाराष्ट्र केसरी स्पर्धे’चं आयोजन केलं आहे. या स्पर्धेसाठी भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह उपस्थित राहतील. बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला आव्हान दिलं होतं. मात्र, राज ठाकरेंनी प्रकृतीच्या कारणास्तव तेव्हा दौरा रद्द केला होता. पण, बृजभूषण सिंह महाराष्ट्रात येणार असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोणती भूमिका घेते? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

हेही वाचा : “चाळीस आमदारांना गाडण्यासाठी…”, अरविंद सावंतांचा शिंदे गटावर हल्लाबोल; म्हणाले…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. त्यासाठी मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी तयारी देखील सुरू केली होती. मात्र, राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांविरोधात घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांनी माफी मागावी. अन्यथा उत्तर प्रदेशात पाय देखील ठेऊ देणार नसल्याचं आव्हान बृजभूषण सिंह यांनी दिलं होतं. त्यामुळे चांगलेच वातावरण तापले होते. टीव्ही ९ मराठीने याबाबत वृत्त दिलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray ayodhya tour opponent brijbhushan singh will come to pune maharashtra kesari competition ssa