देशातील चार राज्यातील जनतेचा कौल आता स्पष्ट झाला आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणात मतमोजणी प्रक्रिया सुरू असली तरीही प्राथमिक अंदाजानुसार कोणी कोणत्या राज्यात मुसंडी मारली आहे याचं चित्र स्पष्ट झालं आहे. दरम्यान, देशभर विधानसभा निवडणुकांची धामधुम असताना महाराष्ट्रात मात्र लोकसभा निवडणुकांची जय्यत तयारी सुरू झाली आहे. पुढील वर्षी देशभर लोकसभेच्या निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकांचा निकाल म्हणजे लोकसभेची सेमीफायनल असल्याचं जाणकरांचं मत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुंबईतील काळाचौकी येथे कोकण महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवाकरता राज ठाकरे आज काळाचौकीत गेले होते. तेथे त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकांबाबतही भाष्य केलं. राज ठाकरे म्हणाले, चार-पाच राज्यांचे आजच निकाल आपल्यापर्यंत आलेले आहेत. पुढच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका होतील. (बाजूला वाजणाऱ्या ढोल-ताशांकडे इशारा करून) या ढोल ताशांपेक्षा जास्त ताशा माझा वाजला जाईल.

BJP leader and MLA Rahul Narvekar elected unopposed as the Speaker of the Legislative Assembly
Rahul Narwekar : नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी फेरनिवड; मंत्रीपदाचे स्वप्न भंगले
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Uddhav Thackeray On Raj Thackeray :
Uddhav Thackeray : “पक्षाला एक हेतू लागतो, पण हे त्या पक्षात…”, उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका
Nagpur evm machines marathi news
ईव्हीएमविरुद्ध शंखनाद…मतपत्रिकेवर मतदान घेण्यासाठी नागपुरात…
cm devendra fadnavis mns chief raj thackeray
Raj Thackeray: राज ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; सरकारमध्ये सहभागी होण्याबाबत म्हणाले, “लोकसभेत त्यांनी…”
Sudhir Mungantiwar On Uddhav Thackeray
Sudhir Mungantiwar : “उद्धव ठाकरेंनी २०१९ मध्ये विश्वासघात केला नसता तर आज…”, भाजपाच्या नेत्याचं मोठं विधान
Balasaheb Thorat On Congress
Balasaheb Thorat : विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला अपयश का आलं? बाळासाहेब थोरातांचं सूचक भाष्य; म्हणाले, “पराभवाची कारणं…”
Sudhir Tambe On Balasaheb Thorat
Sudhir Tambe : बाळासाहेब थोरातांबाबत सुधीर तांबेंचं मोठं विधान; म्हणाले, “भाजपात गेले असते तर आज…”

“काहीजणांना माझ्या ताशाच्या कानठळ्या बसतील, काही जणांना माझ्या ताशाच्या काठ्या बसतील. कल्पना नाही, पण जे काही बोलायचं आहे ते पुढल्या वर्षी बोलू”, असंही राज ठाकरे म्हणाले.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे उमेदवार उभे करणार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी संयमाची भूमिका घेतली होती. लाव रे तो व्हिडीओ म्हणत त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात सभा गाजवल्या होत्या. परंतु, प्रत्यक्षात ते निवडणुकीत उतरले नव्हते. परंतु, यंदा ते चोख तयारीनिशी निवडणुकीत उभे राहणार असल्याचं म्हटलं जातंय.

Story img Loader