मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडखोरीवर बोलताना मोठं विधान केलं आहे. “शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्रप्रेमापोटीच शिवसेना फुटली. शिवसेना फुटीला दुसरं कोणतंच कारण नाही,” असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं. तसेच उद्धव ठाकरे सगळ्या गोष्टी पैशात मोजायचे आणि पक्षाकडे लक्ष द्यायचे नाहीत, असा आरोपही केला. ते शनिवारी (२३ जुलै) झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले, “बाळासाहेब ठाकरेंच्या पुत्रप्रेमापोटीच शिवसेना फुटली. याला दुसरं कोणतंच कारण नाही. तुमची वागणूक, सगळ्या गोष्टी पैशात मोजायच्या, पैशात तोलायच्या. पक्षाकडे बघायचं नाही, लक्ष द्यायचं नाही. आजही सगळे लोक काय सांगत आहेत?”

Uddhav Thackeray and rahul gandhi
इंडिया आघाडीत बिघाडी? विसंवादावरून ठाकरे गटाची काँग्रेसवर तोफ; म्हणाले, “हेवेदावे, जळमटे अन् कुरघोड्यांना…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Anand Dighe and Balasaheb Thackeray
Private:
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
Uddhav thackeray and Prakash Ambedkar
ठाकरेंच्या शिवसेनेने स्वबळाचा नारा दिल्यानंतर प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप; म्हणाले, “आदित्य ठाकरेंच्या…”
What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, “ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले नाहीत ते सगळेजण…”
Sanjay Raut On Municipal Corporation election
Sanjay Raut : मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढणार? संजय राऊतांचं मोठं भाष्य; म्हणाले, “दिल्लीत जे घडलं तेच…”
Sanjay Raut Said This Thing About Raj Thackeray
Sanjay Raut : “बाळासाहेबांची शिवसेना फोडण्यासाठी राज ठाकरेंच्या मनसेचा वापर”; संजय राऊत यांचा गंभीर दावा

“शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरेंना सहानुभुती मिळण्याचा काय संबंध?”

“लोक म्हणतात आज जे सुरू आहे त्यात उद्धव ठाकरेंना सहानुभुती मिळत आहे. मला हे कळालं नाही. यात सहानुभुतीचा काय संबंध?” असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.

शिवसेनेवर बोलताना राज ठाकरे यांनी एक उदाहरण दिलं. ते म्हणाले, “लोकमान्य टिळकांनी किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी, शाहू महाराजांनी जोतिबा फुले यांनी त्यावेळी एक बँक काढली असती आणि ते गेल्यावर ती बँक डबघाईला आली असती तर त्या बँकेत तुम्ही पैसे टाकाल का? त्यावेळी ती बँक टिळकांनी किंवा बाबासाहेबांनी काढली म्हणून तुम्ही पैसे टाकणार नाही.”

“शिवसेना पक्ष बाळासाहेबांचा होता आणि तो बाळासाहेबांसोबत गेला”

“शिवसेना पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा होता आणि तो पक्ष बाळासाहेबांसोबत गेला. आत्ताच्या शिवसेनेत बाळासाहेबांचा विचारही नाही. आजच्या पक्षप्रमुखांच्या अंगावर मराठी किंवा हिंदुत्वाच्या नावाने एक खटला तरी दाखल आहे का? त्या विषयावर मोर्चा काढला, आंदोलन केलं असं काहीच नाही. त्यांची इतकी भाषणं ऐकलीत तर बाळासाहेबांच्या तोंडातील दोन-चार वाक्य सोडली तर त्यांनी काय हिंदुत्व मांडलंय मला सांगावं,” असंही राज ठाकरे यांनी नमूद केलं.

“उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष करण्याच्या ठरावाचा मला अजिबात पश्चाताप नाही”

राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या कार्याध्यक्षपदाच्या ठरावावर बोलताना म्हणाले, “महाबळेश्वरच्या अधिवेशनात उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्ष करण्याच्या ठरावावर मला अजिबात पश्चाताप नाही. कारण शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आहे आणि ते बाळासाहेबांचं अपत्य आहे. त्या संपूर्ण काळात बाळासाहेबांच्या मनात काय चाललं होतं हे मला जाणवत होतं. राजकारणात अशा गोष्टी सांगितलेल्या लोकांना पटत नाहीत किंवा पचत नाहीत. मात्र, तेव्हाही माझ्या मनात कधीही शिवसेनेचा प्रमुख व्हावं, अध्यक्ष व्हावं असं वाटत नव्हतं.”

“शिवसेनेते मला फक्त निवडणुकीत भाषणासाठी बाहेर काढणार अशी स्थिती होती”

“मी अनेकदा बाळासाहेबांना याबाबत पत्रंही लिहिली होती. मी त्या काळातही पक्षात माझी जबाबदारी काय ही एकच गोष्ट विचारत होतो. म्हणजे तुम्ही इतरांवर सगळ्या जबाबदाऱ्या टाकणार आणि मला फक्त निवडणुकीत भाषणासाठी बाहेर काढणार अशी स्थिती तेव्हा शिवसेनेत होती. मी भाषण देतो तेव्हा मी त्या विषयावर पूर्ण स्पष्टतेने बोलत असतो. मी बोलल्यानंतर जर ती गोष्ट झाली नाही तर पुढच्या वेळी त्या लोकांसमोर जाऊन मी काय भाषण करायचं. मी दुसऱ्यांच्या जीवावर माझा शब्द टाकत बसायचा. हे शक्य नव्हतं,” असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

हेही वाचा : शिवसेना फुटीला भाजपा जबाबदार की शरद पवार? राज ठाकरे स्पष्टच बोलले, म्हणाले…

“…म्हणून मी महाबळेश्वरच्या अधिवेशनात उद्धव ठाकरेंचं कार्याध्यक्ष म्हणून नाव जाहीर केलं”

राज ठाकरे पुढे म्हणाले, “उरला विषय अध्यक्षपदाचा तर तो बाळासाहेब ठाकरेंचा निर्णय होता. मी बाळासाहेब ठाकरे यांना महाबळेश्वराला सांगितलं की, काका तुझ्या मनात काय आहे हे मला माहिती आहे. आम्ही एकमेकांना आरे-कारे बोलायचो. मी त्यांना सांगितलं की तुम्ही उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष करा, मी जाहीर करेन. म्हणजे राज की उद्धव हा विषय बंद होईल. सर्व बातम्या माझ्या आणि उद्धव ठाकरेंच्या नावाने येत असतील तर मीच विषय बंद करतो असं मी सांगितलं. त्याप्रमाणे मी तो विषय बंद केला. त्यामुळे त्यावर पश्चाताप होण्याचा विषयच येत नाही.”

Story img Loader