मनसे प्रमुख राज ठाकरे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोघे एकत्रित येण्याच्या चर्चा अनेकदा होतात. मध्यंतरी २०१४ व २०१७ या वर्षांमध्ये राज आणि उद्धव यांच्यात टाळी देण्यावरूनही जोरदार चर्चा झाली. तसेच शिवसेना-मनसे युतीचे तर्कवितर्क लावले गेले. याबाबत राज ठाकरेंना विचारलं असता त्यांनी उद्धव ठाकरे विश्वासार्ह नसल्याचं मत व्यक्त केलं आहे. ते शनिवारी (२३ जुलै) झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राज ठाकरे म्हणाले, “उद्धव ठाकरे हा माणूस बोलतो वेगळं आणि करतो वेगळं. त्यांच्यावर विश्वास ठेवण्यासारखं काहीच नाही. बाकीच्या माणसांसाठी मला वाईट वाटतं, पण हा माणसू विश्वास ठेवण्यासारखा नाही.”

“उद्धव ठाकरे काय आहे हे मला माहिती आहे.”

“बाळासाहेब ठाकरे भावनेचा विषय होता आणि तो विषय आजारपणाचा होता. त्यामुळे मी तेव्हा फोन आल्यावर रुग्णालयात गेलो. परंतू मला उद्धव ठाकरे काय आहे हे माहिती आहे. अख्ख्या देशाला आणि महाराष्ट्राला माहिती नाही, इतका जवळून मला माहिती आहे,” असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

“काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपाला कानडी, तामिळ लोक मतदान करत नाहीत”

मराठीच्या मुद्द्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, “शिवसेना, मनसेबाबत मराठी माणूस हा विषय काढला जातो. मात्र, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा यांना कानडी, तामिळ असे लोक मतदान करत नाहीत. मराठी लोकच मतदान करत आहेत. मराठी म्हटलं की शिवसेनेलाच मतदान असं नाही. हे डोक्यातून काढून टाकलं पाहिजे. महाराष्ट्रात जी लोकं मतदान करतात ती लोकं मराठीच आहेत.”

हेही वाचा : “मी देवेंद्र फडणवीसांना उगाच फुकटचं श्रेय घेऊ नका असं सांगितलं, कारण…”; राज ठाकरेंचं वक्तव्य

“मातोश्री संकटात नाही”

मातोश्री संकटात आहे असं बोललं जातं. त्यावरही राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “मातोश्री ही एक वास्तू आहे आणि शिवसेना एक संघटना आहे. वास्तू आहे तिथेच आहे. त्याला काहीच अडचण नाही. विषय संघटनेचा आहे आणि जो माणूस संस्थापक होता तो माणूस आज संघटनेत नाही. ना त्या माणसाचा विचार संघटनेत, पक्षात आहे.”