सध्या शिवसेना पक्षात उभी फुट पडली आहे. शिवसेनेत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे समर्थक असे दोन गट पडले आहेत. शिवसेनेतील पक्षफुटी आणि त्याची कारणं याबद्दल मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे. तसेच शिवसेनेचे नेतृत्व आणि महाबळेश्वर येथील शिवसेनेच्या अधिवेशनात उद्धव ठाकरे यांच्याकडे नेतृत्व सोपण्याच्या निर्णयावरही राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाबळेश्वर येथे ठेवलेल्या प्रस्तावाबद्दल कोणताही पश्चात्ताप होत नाही. मी फक्त त्यांना माझी जबाबदारी काय आहे, असे विचारत होतो, असे राज ठाकरे म्हणाले.
हेही वाचा >>> “मी देवेंद्र फडणवीसांना उगाच फुकटचं श्रेय घेऊ नका असं सांगितलं, कारण…”; राज ठाकरेंचं वक्तव्य
राज ठाकरे यांनी झी २४ तास या मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी बोलताना, “उद्धव ठाकरे यांना शिवसेना पक्षप्रमुख करावं असा प्रस्ताव मी दिला होता. त्याबद्दल मला कोणताही पश्चात्ताप होत नाही. कारण शिवसेना ही बाळासाहेबांची आहे आणि उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे आपत्य आहेत. त्या काळात बाळासाहेब ठाकरेंच्या मनात काय सुरु होते, हे मला माहिती आहे. राजकारणामध्ये अशा गोष्टी सांगितल्या तर हे पटत नाहीत. तेव्हा माझ्या मनात शिवसेनेचा प्रमुख व्हावं, असं कधीही आलं नाही,” असे राज ठाकरेंनी सांगितले.
हेही वाचा >>> राज ठाकरे शिवसेना पक्षातून का बाहेर पडले? थेट उत्तर देत म्हणाले “कुंटुबातीलच लोक…”
“मी याबाबत बाळासाहेब ठाकरेंना पत्रंही लिहीली होती. मी फक्त एकच गोष्ट विचारत होतो की माझा जॉब काय आहे? इतरावंर आपण सर्व जबाबदारी देणार आणि निवडणुकीसाठी मला भाषणासाठी बाहेर काढणार. दुसऱ्यांच्या जीवावर मी माझा शब्द टाकत बसायचा हे शक्य नव्हतं. शिवसेना पक्षप्रमुखपदाचा निर्णय बाळासाहेब ठाकरेंचा होता,” असेही राज ठाकरे यांनी सांगितले.
हेही वाचा >>> शिवसेना फुटीला भाजपा जबाबदार की शरद पवार? राज ठाकरे स्पष्टच बोलले, म्हणाले…
“महाबळेश्वरला असताना मी सांगितलं की मला तुमच्या मनात (बाळासाहेब ठाकरे) काय आहे, हे माहिती आहे. उद्धव ठाकरेंना तुम्ही अध्यक्ष करा. पण जाहीर मला करु द्या. कारण मग राज की उद्धव हा विषय बंद होईल. त्याप्रमाणे मी विषय बंद केला. पश्चात्ताप करण्याचा विषय नव्हता.” असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.