Raj Thackeray : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक येत्या काही दिवसांमध्ये पार पडणार आहे. २० तारखेला मतदान आणि २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगतो आहे. त्याचप्रमाणे मनोज जरांगे फॅक्टर काय करणार याचीही उत्सुकता आहे. तसंच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी कुणाचा खेळ बिघडवणार याचीही उत्सुकता शिगेला पोहचली आहे. राज ठाकरेंनी ( Raj Thackeray ) पहिल्यांदाच अमित ठाकरेंना माहीममधून उमेदवारी दिली आहे. माहीम या ठिकाणी भाषण करताना राज ठाकरेंनी ( Raj Thackeray ) उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

“अमितच्या विरोधात जे जे उभे आहेत, त्यांची सगळी अंडी-पिल्ली मी बाहेर काढू शकतो. मात्र मला त्या घाणीत हात घालायचा नाही. ज्यांच्या पोटात आग आहे, एक एनर्जी आहे अशी माणसं मला महाराष्ट्र घडवण्यासाठी हवी आहेत. मी आज तुम्हाला सांगतोय अमित राज ठाकरे असं नाव असलं तरीही त्याला भेटायला तुम्हाला अपॉईंटमेंटची गरज लागणार नाही. मी सगळ्या उमेदवारांना सांगितलं आहे की तुम्ही तुमचा एक मोबाईल क्रमांक जनतेसाठी दिलाच पाहिजे तिथे तुम्ही किंवा तुमचा माणूस लोकांसाठी उपलब्ध असलाच पाहिजे. विधानसभेत चांगली माणसं पाठवायची हे माझं स्वप्न आहे.” असंही राज ठाकरे ( Raj Thackeray ) म्हणाले.

अरविंद केजरीवाल आणि 'आप'ला रोखण्यासाठी भाजपाची मतदारांना कोणती आश्वासनं? (फोटो सौजन्य पीटीआय)
अरविंद केजरीवाल आणि ‘आप’ला रोखण्यासाठी भाजपाची मतदारांना कोणती आश्वासनं?
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
What Ajit Pawar Said?
Ajit Pawar : धनंजय मुंडे नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देणार का? विचारताच अजित पवारांचं उत्तर, “मी इतकं स्पष्ट सांगतो….”
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal : “केजरीवाल आणि पंतप्रधान मोदी यांच्यात फरक नाही, दोघेही…”; राहुल गांधींच्या टीकेला आप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
What Amruta Fadnavis Said?
Amruta Fadnavis : उद्धव ठाकरेंबाबतच्या प्रश्नावर अमृता फडणवीस यांचं उत्तर, “राजकारणात आज शत्रू असणारा उद्या मित्र..”
Sanjay Raut Answer to Amit Shah
Sanjay Raut : संजय राऊत यांचं अमित शाह यांना उत्तर, “उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आणि…”

राज ठाकरेंचा सदा सरवणकरांना टोला

इथे जे लोक उभे आहेत त्यांच्याबद्दल मला काहीही बोलायचं नाही. बाळासाहेब हयात असताना ही व्यक्ती काँग्रेसमध्ये गेली. त्यानंतर पुन्हा शिवसेनेत आली. मग एकनाथ शिंदेंनी बंड केलं. सकाळी त्यांना शिव्या घातल्या आणि मग संध्याकाळी त्यांच्याबरोबर जाऊन बसले असल्या लोकांबद्दल काय बोलायचं? शिवसेनेतून मी पण बाहेर पडलो पण बाळासाहेब ठाकरेंना सांगून बाहेर पडलो असंही राज ठाकरे ( Raj Thackeray ) म्हणाले. तसंच त्यांनी उद्धव ठाकरेंच्या आजारपणाच्या वेळी काय घडलं होतं ते पण सांगितलं.

हे पण वाचा- Raj Thackeray : राज ठाकरे निवडणूक का लढवत नाहीत? बाळासाहेब ठाकरेंबरोबरचा ‘तो’ प्रसंग आठवत म्हणाले…

मी बाळासाहेब ठाकरेंना सांगून शिवसेना सोडली-राज ठाकरे

“२००६ मध्ये मी शिवसेनेतून बाहेर पडलो. मी त्यावेळी म्हटलं होतं माझा वाद माझ्या विठ्ठलाशी नाही त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे. जे जे लोक शिवसेनेतून बाहेर पडले ते वेगळ्या पक्षात गेले. जेव्हा हे सगळं घडत होते तेव्हा ३८ आमदार आणि सहा ते सात खासदार आले होते. मला सांगितलं होतं की आपण उठून सत्तेत जाऊ. मी त्यांना सांगितलं माझा वाद बाळासाहेबांशी नाही. अनेक लोक शिवसेना सोडून बाहेर पडले. मी बाळासाहेब ठाकरेंना सांगून बाहेर पडलेला माणूस आहे. मला ही गोष्ट पटत नाही, माझी घुसमट होते आहे हे त्यांना सांगितलं. मी जेव्हा त्यांना हे सांगितलं तो दिवस अजूनही आठवतो आहे. त्यांच्या लक्षात आलं की राज ( Raj Thackeray ) थांबणार नाही. त्यावेळी त्यांनी मला असे हात केले होते, मला शेवटची मिठी मारली आणि म्हणाले जा. माझ्याकडे आमदार, खासदार आले होते मात्र मला पक्ष फोडून काहीही करायचं नव्हतं. “

उद्धव आजारी झाला तेव्हा कार घेऊन मी स्वतः गेलो होतो-राज ठाकरे

“तुम्हाला आठवत असेल उद्धव आजारी पडला तेव्हा कार घेऊन मी स्वतः गेलो होतो तिकडे. मी अलिबागला होतो, त्यावेळी मला बाळासाहेबांचा फोन आला त्यांनी मला विचारलं की तुला कळलं का? मी त्यांना म्हटलं की होय मी निघालो आहे. मी कुटुंबाच्या आड कधीही राजकारण येऊ दिलं नाही. मागच्यावेळी वरळीत आदित्य उभा होता. मी त्यावेळी जाहीर केलं की आम्ही तिथे उमेदवार देणार नाही. माझ्या मनातून आलेली ही गोष्ट होती. मी काही कुणाला फोन केला नाही की पुढच्या वेळी मला सांभाळून घ्या. मी काही कुणाकडे भीक मागत नाही. आज अमित उभा आहे तरीही मी भीक मागणार नाही. मी या सगळ्यांना सांगितलं होतं की लोकसभेला बिनशर्त पाठिंबा दिला तेव्हा माझ्या मनातही नव्हतं की अमित निवडणुकीला उभा राहिल, त्याच्याही मनात नव्हतं. त्यामुळे तो विषयच नव्हता. मी उमेदवार द्यायला कुणाला नकार दिलाच नव्हता. जे समोर येतील त्यांच्याशी लढू, पण अमितला निवडून नक्की आणणार” असं राज ठाकरे ( Raj Thackeray ) म्हणाले.

Story img Loader