विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अमरावतीमध्ये दाखल झालेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांच्याशी भेट झालेली नसल्याची माहिती मिळाली आहे.
राज ठाकरे आजपासून विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये प्रचारसभा घेणार आहेत. सोमवारी संध्याकाळी रेल्वेने ते मुंबईहून अमरावतीकडे रवाना झाले. मंगळवारी सकाळी अमरावतीमध्ये पोहोचल्यावर राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये उतरले होते. तिथेच नितीन गडकरीही आधीपासून थांबलेले होते. त्यामुळे काही वृत्तवाहिन्यांनी राज ठाकरे आणि नितीन गडकरी यांची हॉटेलमध्ये भेट झाल्याचे वृत्त प्रसारित केले. मात्र, राज ठाकरे हॉटेलवर दाखल होण्यापूर्वीच नितीन गडकरी हॉटेलवरून पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी अमरावतीमधील भाजप नेते जगदीश गुप्ता यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यामुळे त्यांची हॉटेलमध्ये राज ठाकरे यांच्याशी भेट झालेली नाही.
राज ठाकरे मंगळवारी दुपारी अमरावतीमध्ये जाहीर सभा घेणार आहेत.

Story img Loader