Raj Thackeray New Year Post: २०२४ वर्षाला निरोप देतानाच २०२५ या नव्या वर्षाच्या स्वागताचा जल्लोष मंगळवारी दुपारपासूनच जगभरातल्या अनेक देशांमध्ये आणि मध्यरात्री भारतीय उपखंडात पाहायला मिळाला. देशभरात नव्या वर्षाच्या स्वागतासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. एकीकडे सामान्य जनता रस्त्यावर उतरून जल्लोष करत असताना दुसरीकडे नेतेमंडळींनी नववर्षाच्या शुभेच्छांसाठी सोशल मीडियाचा पर्याय निवडला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देण्यासाठी एक्सवर सविस्तर पोस्ट शेअर केली आहे.

राज ठाकरेंच्या पोस्टमध्ये काय?

राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये गेल्या २५ वर्षांत झालेले बदल, मनसेची स्थापना आणि प्रवास, जनतेच्या कायम राहिलेल्या समस्या, निवडणुकीतील पक्षाचं अपयश, मराठी भाषिकांच्या अडचणी, महिलांवरील अत्याचार, निवडणुकांसाठी नसून लोकांसाठी काम करण्याचं पक्षाला आवाहन अशा अनेक बाबींचा समावेश केला आहे.

raj thackeray urges writers to speak on political issues
सरकार कोणाचेही असो, बोलले पाहिजे! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे साहित्यिकांना आवाहन
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Raj Thackeray
Raj Thackeray : “अभिनेत्यांना पुरस्कार मिळतो, पण आमच्या वाट्याला फक्त…”, राज ठाकरेंची तुफान फटकेबाजी
Uddhav Thackeray, Ahilyanagar, existence,
अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला गळती, अस्तित्वाचा प्रश्न
Amol Mitkari Taunts Raj Thackeray
Raj Thackeray : “राज ठाकरेंनी त्यांच्या सुपुत्राचा पराभव का झाला आणि मनसेचा…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा टोला
Raj Thackeray Speech in Mumbai
Raj Thackeray : राज ठाकरेंचं भाजपा नेत्यांबाबत भाष्य, “मुंबईत चहा प्यायला घरी येतो म्हटल्यावर काय सांगायचं, घरीच..”
Raj Thackeray Speech News
Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य, “अजित पवार यांचे ४२ आमदार आणि शरद पवारांचे १० आमदार हे कसं शक्य आहे? लोकांनी…”
Raj Thackeray on chhava movie Video
Raj Thackeray: “छत्रपती संभाजी महाराजांनी कधीतरी लेझीम…”, ‘छावा’चित्रपटावर राज ठाकरेंची रोखठोक भूमिका

“सर्व प्रथम सर्वांना इंग्रजी नवीन वर्षाच्या शुभेच्छा ! कालगणनेत या वर्षाला एक महत्व आहे , कारण या शतकातील, पाव शतक संपायला आलं. माणसाच्या आयुष्यातल्या जवळपास प्रत्येक क्षेत्रांत इतके प्रचंड बदल झालेत की २५ वर्षांपूर्वीच आयुष्य हे वेगळं युग वाटावं. या २५ वर्षांच्या कालखंडात आपला पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्याची स्थापना झाली, तो स्थिरावला, पक्षाने अनेक चढउतार पाहिले. आणि हे सगळं आपल्या सगळ्यांना खूप काही शिकवून गेलं”, असं राज ठाकरे आपल्या पोस्टच्या सुरुवातीलाच म्हणाले आहेत.

निवडणुकीतील अपयशाची खंत

“या २५ वर्षांत जरी खूप बदल झाला असला तरी अनेक गोष्टी तशाच राहिल्यात, मुंबईसारख्या महानगरात जी महाराष्ट्राची राजधानी आहे, तिथे मराठी माणसाला असुरक्षित वाटणं. तरुण मुलामुलींच्या हाताला काम न मिळणे पण त्याच वेळेस बाहेरच्या राज्यातून येणाऱ्यान नोकरीच्या संधी मिळणं. बेरोजगाराला जात नसते, पण त्याला ती जात जाणवून देऊन, जातीजातीत भांडणं लावणं. शेतकऱ्यापासून ते सर्वच कष्टकऱ्यांच आयुष्य महागाईने होरपळून निघणं. आणि या आणि इतर प्रत्येक समस्येच्या वेळेस लोकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आठवण होणे, पण नेमकं मतदानाच्या वेळेस पक्षाचा विसर पडणे”, अशा शब्दांत राज ठाकरेंनी आपली खंत व्यक्त केली आहे.

Raj Thackeray on Manmohan Singh Demise: “जे त्यांनी न बोलता करून दाखवलं, ते अनेकांना…”, राज ठाकरेंची मनमोहन सिंग यांना सोशल पोस्टमधून श्रद्धांजली!

“पण ठीक आहे, हे स्वीकारून आपण आता काही बदलांसकट पुढे जायला हवं. २३ नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभेचे निकाल लागल्यानंतर मी काही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झालो, पण मुद्दाम राजकीय भाष्य टाळलं. नक्की काय घडलं यावर माझं मंथन सुरु आहे आणि लवकरच मी या सगळ्यावर सविस्तर बोलेन”, असं राज ठाकरेंनी या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

निवडणुकीत जे घडलं ते विसरून जा – राज ठाकरे

“महाराष्ट्र सैनिकांना माझं आवाहन आहे की जे घडलं ते विसरून जा. निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर पुढे काही आठवड्यातच मराठी माणसांविरोधात दंडेलशाही सुरु झाली, आणि त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दणका द्यावा अशी अपेक्षा व्यक्त झाली आणि जे आपण केलं देखील. मुळात मराठी माणूस हा फक्त मतदानासाठी वापरला जातोय हे वास्तव अधोरेखित झालं. त्यात महिलांविरोधात अत्याचार वाढतच आहेत. राज्यातले दोन समाज जे दोन्ही मराठी भाषिक, पण त्यांच्यात संघर्ष पेटला आहे. आणि महागाईने लोकं होरपळली आहेत”, असं आवाहन त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व नेतेमंडळींना केलं आहे.

यावेळी महिलांवरील अत्याचारांना वाचा फोडण्यासाठी पक्षाच्या प्रत्येक कार्यालयात संपर्क कक्ष सुरू करण्याचं आवाहन राज ठाकरेंनी केलं. “महिलांच्या तक्रारींचा पाठपुरावा करा. तरीही काही होत नसेल तर मग हात मोकळे सोडून अत्याचार करणाऱ्या नराधमांना चांगलं फोडून काढा”, असा आदेशही राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिला आहे. “लवकरच मी सविस्तर बोलेन, त्यात अधिक व्यापक दिशा तुम्हाला देईनच”, असंही पोस्टच्या शेवटी त्यांनी नमूद केलं आहे.

Story img Loader