Raj Thackeray in Borivali : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. मनसेचा गेल्या निवडणुकीत एकच आमदार निवडून आला होता. परंतु, आता त्यांना सत्तेचे वेध लागले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त उमेदवार जिंकून येण्याकरता त्यांनी कंबर कसली आहे. दरम्यान, ज्या जागांवर त्यांना विजय निश्चित वाटतोय अशा मतदारसंघात जाऊन ते प्रचार सभा घेत आहेत. आज ते मुंबईतील बोरिवली विधानसभा मतदारसंघात कुणाल माईनकर आणि आजूबाजूच्या मतदरासंघातील उमेदवारांचा प्रचार करण्याकरता आले होते. त्यानंतर ते वर्सोवा आणि प्रभादेवीला जाणार होते. परंतु, त्यांनी आता वर्सोव्याची सभा रद्द केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहर नियोजन, मराठी अस्मिता, राज्यातील राजकीय समिकरणे आदी विविध मुद्द्यांवर राज ठाकरे बोरिवलीतील जनतेशी संवाद साधत होते. त्यांनी आजवर जनतेसाठी केलेल्या कामांची उजळणी केली. दरम्यान, सभा संपत असतानाच त्यांनी त्यांच्या उमेदवारांना बोलावलं. तेवढ्यातच मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार नयन कदम यांना एक कॉल आला. राज ठाकरेंनी व्यासपीठावर बोलावताच नयन कदम यांनी तो फोन राज ठाकरेंना दिला. सभा थांबवून राज ठाकरे फोनवर बोलत होते. त्यामुळे नेमकं काय घडतंय याचा पत्ता जनतेला लागत नव्हता. फोन ठेवल्यानतंर राज ठाकरे म्हणाले, “मी तुमच्याशी अजून पंधरा मिनिटे बोलू शकतो. मला आता इथून वर्सोवाला जायचं होतं. तिथं जायला मला एक-सव्वा तास लागला असता. तिथून मला पुन्हा प्रभादेवीला जायला एक-सव्वा तास लागला असता. त्यामुळे शेवटची सभा घेता आली नसती. त्यामुळे वर्सोवातील लोकांनी मला सांगितलं की सभेच्या ठिकाणी स्क्रीन लावली आहेत. त्यामुळे इथून लाईव्ह सभा तिथे दाखवत आहेत. त्यामुळे संदेश देसाई आणि विरेन जाधव या उमेदवारांनी सांगितलं की इथूनच तुम्ही बोला.”

राज ठाकरेंनी सुरुवातीपासून टाऊन प्लानिंग, मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाचा जागर केला आहे. निवडणुकीच्या दरम्यानही त्यांनी हेच मुद्दा अधोरेखित केलेत. प्रत्येक सभेत त्यांनी शहराचं प्लानिंग कसं चुकलंय यावर भाष्य केलं आहे. आजच्या सभेतही त्यांनी तोच कित्ता गिरवला. बोरिवली सभा आटोपल्यानंतर ते माहिमच्या दिशेने निघाले. परंतु, जातना प्रचंड ट्राफिक लागल्याने त्यांनी सर्व सिग्नल्स तोडल्याचं स्वतःहून कबूल केलं. माहिममध्ये जनतेला संबोधित करताना ते असं म्हणाले.

हेही वाचा >> Raj Thackeray : ‘सत्तेत जायचा फॉर्म्युला काय?’ राज ठाकरे म्हणाले, “या निवडणुकीत..”

राज ठाकरेंच्या सूचना कार्यकर्त्यांनी धुडकावल्या?

राज ठाकरेंच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजी केली जातेय. फटाक्यांचा आवाज शांत होत नाही तोवर राज ठाकरेंना भाषण करता येत नाही. त्यामुळे आतापर्यंत त्यांना निरर्थक थांबावं लागत होतं. त्यामुळे माझ्या स्वागताला फटाके लावू नका, अशा सूचना राज ठाकरे यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. परंतु, आजच्या बोरिवलीतील प्रचारसभेत फटाके लावण्यात आले. त्यामुळे व्यासपीठावरूनच त्यांनी पदाधकाऱ्यांची कानउघाडणी केली. सूचना दिलेल्या असातनाही फटाके का लावले असा सवाल त्यांनी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या नेत्यांना विचारला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray in borivali for vidhansabha election 2024 prachar versova rally cancel sgk