Raj Thackeray in Ghatkopar Speech : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे जिल्ह्याजिल्ह्यांत जाऊन प्रचारसभा घेत आहेत. सातत्याने होत असलेल्या सभांमध्ये ते सत्ताधारी आणि विरोधकांवर निशाणा साधत आहेत. तसंच, सभा संपता संपता मला एकदा संधी द्या, अशी विनंतीही करत आहेत. आज त्यांनी घाटकोपरमध्ये मतदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मी नालायक ठरलो तर माझं दुकान बंद करेन, असं आवाहन केलं.

“२००६ मध्ये पहिल्या सभेत सांगितलं होतं की जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र मला घडवायचा आहे”, असं राज ठाकरे म्हणाले. ते पुढे म्हणाले, “तुमचा स्वाभिमानी कणा मतदानादिवशी जागृत राहायला पाहिजे. या सर्वांना संधी देऊन बघितलीत. एकदा राज ठाकरेच्या हातात देऊन बघा. नालायक ठरलो तर तोंड दाखवायला समोर येणार नाही. दुकान बंद करून टाकेन”, असं राज ठाकरे म्हणाले.

raj Thackeray Asilata Raje
Raj Thackeray : स्वातंत्र्यवीर सावरकरांची नात आहे राज ठाकरेंची बालमैत्रीण, म्हणाले, “आम्ही शिशूवर्गापासून…”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Raj Thackeray on Viral Video
Raj Thackeray : “लोकांच्या मनोरंजनाकरता बाई भोजपुरी गाण्यावर नाचतेय”, ‘त्या’ व्हायरल VIDEO वर राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया!
Raj Thackeray on shivsena and ncp split
Raj Thackeray Speech : शिवसेनेवर कुणाचा अधिकार? राज ठाकरेंनी स्पष्ट शब्दांत मांडली भूमिका; राष्ट्रवादी काँग्रेस फुटीवरही केलं भाष्य!
Raj Thackeray kalyan Rural
Raj Thackeray Speech : “काकांनी डोळे वटारले अन् लगेच…!” सकाळच्या शपथविधीवरून राज ठाकरेंचा अजित पवारांना चिमटा
Uddhav Thackray Warns to Independent Candidates to take Back The Name
Uddhav Thackeray : “अपक्ष किंवा बंडखोरांनी अर्ज मागे घेतले नाहीत तर…”, उद्धव ठाकरेंचा इशारा
raj thackerat latest news
राज ठाकरेंना आईच्या हातचं जेवण आवडतं की पत्नीच्या हातचं? शर्मिला ठाकरे पुढच्याच क्षणी म्हणाल्या अर्थात…
chandrapur mns district president Mandeep Rode has cheated chief Raj Thackeray
स्वत: राज ठाकरेंनी गावात येऊन उमेदवारी दिली…पण, उमेदवाराने ऐनवेळी….

“सर्वकाही सत्ता नसताना केलंय. इतर कोणत्याही राजकीय पक्षाला विचारावं तुम्ही काय काय केलं? कोणत्या भूमिका मांडल्या? कोणत्याही नाही. यांचं सरकार आलं, आमचे शेतकरी आत्महत्या करत आहेत, बेरोजगार तरुण रस्त्यावर फिरत आहेत. कोणत्या वातावरणात जगताय तुम्ही? कसलं वातावरण, कसल्या निवडणुका घेऊन बसलो आहोत आपण. नुसते उन्हातान्हांत मतदानाला उभे राहताय”, असं म्हणत त्यांनी येत्या २० तारखेला मनसेला मतदान करण्याचं आवाहन केलं.

“शहराचा विचका झालाय. किती माणसं येतात, किती वाहनं येतात, रस्ते अपुरे पडतात, फुटपाथ अपुरे पडतात. पण आम्ही सोसतोय. आज आत्ता येत असताना एक पुस्तक सापडलं मला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेली आंदोलनं, कामं.. मला नाही वाटत कोणत्याही पक्षाची हिंमत असेल की आपल्या कामांवरती पुस्तक काढावं”, असंही राज ठाकरे म्हणाले.

हेही वाचा >> राज ठाकरे म्हणतात, “एकाही मशिदीवर भोंगा दिसणार नाही”

१७ हजार महाराष्ट्र सैनिकांवर गुन्हे दाखल केले

“४ वर्षांपूर्वी सांगितलं होतं की सर्वांना त्रास होतोय. मी म्हटलं होतं की मशि‍दीचे भोंगे उभे केले तर त्यासमोर मनसेचा सैनिक हनुमान चालिसा म्हणेल. तेव्हा उद्धव ठाकरेंचं सरकार होतं. त्रांगडं झालं होतं मध्यंतरी त्या सरकारचं. तीन वेगवेगळ्या प्राण्यांचं लग्न झालं, बाहेर काय पडणार? असं म्हणत राज ठाकरेंनी महाविकास आघाडीवर टीका केली. ते म्हणाले, “उद्धव ठाकरेंचं सरकार असताना भोंग्याचा विषय आणला, मनसैनिक महाराष्ट्रभर गेले, कित्येक लोकांनी स्वतःहून भोंगे बंद केले. १७ हजार महाराष्ट्र सैनिकांवर गुन्हे दाखल केले गेले. का? सणांना भोंगे वाजले तर समजू शकतो”, असंही राज ठाकरे म्हणाले.

c