Raj Thackeray Speech : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून आज प्रचाराचा नारळ फोडला. २०१९ मध्ये निवडून आलेले त्यांचे एकमेव आमदार राजू पाटील यांच्या मतदारसंघातून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली. या सभेत त्यांनी महाविकास आघाडी आणि महायुतीती सर्वच मित्रपक्षांना लक्ष्य केलं. तसंच, आमदार आणि पक्ष फोडाफोडीच्या राजकारणावरूनही त्यांनी टीका केली.

राज्यात कोणतं राजकारण सुरू आहे? महाराष्ट्राचं हे भवितव्य आहे का? महाराष्ट्रातील तरुण, तरुणी काम मागत आहेत. महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करत आहे. कामगार कसाबसा काम करतोय. यांची फक्त मजा चालू आहे. कधी यांच्याबरोबर, तर कधी त्यांच्याबरोबर!”, असं म्हणत राज ठाकरेंनी सद्यस्थितीवर टीका केली.

What Amit Thackeray Said About Raj Thackeray and Uddhav Thackeray?
Amit Thackeray : “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी मुळीच एकत्र येऊ नये, कारण..”; अमित ठाकरे काय म्हणाले?
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Badnera Vidhan Sabha Assembly Priti Band
Priti Band : उद्धव ठाकरेंना धक्का; ऐन निवडणुकीत बडनेरात ठाकरे गटात बंडखोरी, प्रिती बंड अपक्ष निवडणूक लढणार
Amit Thackeray and Uddhav Thackeray
Amit Thackeray on Uddhav Thackeray : “… अन् दोन भाऊ एकत्र येण्याचा विचार माझ्यासाठी संपला”, अमित ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस, dharashiv district, paranda assembly constituency,
परंड्यात आघाडीत बिघाडी? ठाकरेंची सेना-मोठ्या पवारांची राष्ट्रवादी आमनेसामने
Zeeshan Siddique slams Uddhav Thackeray
झिशान सिद्दिकींच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी दिला उमेदवार; खोचक पोस्टमध्ये म्हणाले, “सुना है पुराने दोस्तों ने…”
What Kiran Pavasakar Said About Uddhav Thackeray?
Shivsena Vs MNS : “उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंबरोबरचं नातं जपायला हवं होतं आणि…”, ‘या’ नेत्याची बोचरी टीका!
MNS Second List Announced
MNS List : मनसेने जाहीर केली उमेदवारांची यादी, अमित ठाकरे माहीममधून, तर वरळीतून आदित्य ठाकरेंना ‘हा’ उमेदवार देणार आव्हान

हेही वाचा >> Raj Thackeray Speech : “काकांनी डोळे वटारले अन् लगेच…!” सकाळच्या शपथविधीवरून राज ठाकरेंचा अजित पवारांना चिमटा

“हे असे का वागतात? कारण तुम्ही चिडत नाही. तुम्ही शांत, लोणाच्या गोळ्यासारखे बसलेले असता. याच लोकांना वारंवार मतदान करता. म्हणून त्यांना तुमची पर्वा नाही. तुम्हाला गृहीत धरलं जातं. कोण आहे ही महाराष्ट्राची जनता. काय उखडणार आमचं? आम्ही कसंही वागलो तरी चालेल. पैसे तोंडावर फेकून मारू. हे गुलाम काय करतील. हा समज मोडत नाहीत तोवर ही माणसं वठणीवर येणार नाहीत”, असं म्हणत राज ठाकरेंनी मतदारांचेही कान टोचले.

आमदार फोडाफोडीचं राजकारण आता पुढे गेलंय

“कुणी कोणासोबत शय्यासोबत करतंय, शरम लाज नाही. असा महाराष्ट्र नव्हता आपला. अशाप्रकारे गद्दारी केलेले लोक पाहिले आहेत. १९९० सालापासून पाहिले आहेत. लोकांना सामोरे जायला भीती वाटतेय. आता काही वाटत नाही. या लोकांनी तुमच्या मतांचा अपमान केला. आमच्या मतांचा अपमान करून काही वाटत नसेल तर देवा वाचव या महाराष्ट्राला. कोणी कोणाच्या अभद्र युत्या करतंय, आघाड्या करतंय. या सर्व फोडाफोडाच्या राजकारणाचे आद्य शरदचंद्र पवार. १९७८ ला त्यांनी काँग्रेस फोडली. १९९२ ला शिवसेना फोडली. २००५ ला नारायण राणेंना फोडलं. आमदार फोडले. हे फोडाफोडीचं राजकारण चालतं. आता प्रकरण पुढे गेलं. आता फक्त फोडाफोडीवर राहिलं नाही. आता पक्षच ताब्यात घ्यायचा. निशाणी आणि नाव ताब्यात घ्यायचं”, असंही राज ठाकरे म्हणाले.

शिवसेना ही बाळासाहेबांची प्रॉपर्टी

“एकनाथ शिंदेंनी नाव आणि निशाणी घेतली. अजित पवारांनी नाव घेतलं, निशाणी घेतली. आता शिवसेना नाव आणि धनुष्यबाण ही ना एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी आहे आणि नाही उद्धव ठाकरेंची. ती बाळासाहेबांची प्रॉपर्टी आहे. त्याला कसे हात लावता? तुम्हाला काय ते आमदार फोडाफोडीचं राजकारण करा”, असं म्हणत राज ठाकरेंनी शिवसेनेतील बंडखोरीवर भाष्य केलं.

ते पुढे म्हणाले, “माझे कितीही मतभेद असले तरीही राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ हे शरद पवारांचं अपत्य आहे. ते अजित पवारांचं अपत्य नाही. महाराष्ट्राची वैचारिक किती घसरण व्हावी? पक्ष पळवतात, निशाणीच्या निशाणी पळवतात. माणसं पळवली जातात. ज्या महाराष्ट्राकडे सुस्कृंत महाराष्ट्र म्हणून पाहिलं जायचं, देशाला दिशा देणारं राज्य म्हणून पाहिलं जायचं, त्या महाराष्ट्राची ही अवस्था. अशा गोष्टी उत्तर प्रदेश-बिहारमध्ये होतात. महाराष्ट्राचं उत्तर प्रदेश बिहार करायचं आहे का आम्हाला?”, असंही राज ठाकरे म्हणाले.