Raj Thackeray in Nashik Speech : सोमवारी संध्याकाळी महाराष्ट्रातील निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावतील. त्यामुळे राज्यातील विविध भागांत आता शेवटच्या सभा घेण्याचं काम स्टार प्रचारक करत आहेत. परंतु, हा निवडणुकीचा काळ म्हणजे कंटाळवाणा असल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलंय. ते आज नाशिकमध्ये बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये बरंच काम केलंय. महापालिका मनसेच्या हातात होती तेव्हा त्यांनी अनेक विकासकामे केल्याचा दावा केला जातोय. त्यामुळे नाशिकमधील निवडणूक राज ठाकरेंची अटीतटीची निवडणूक आहे. दरम्यान, निवडणुकीच्या निमित्ताने राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील विविध मतदारसंघ पिंजून काढले आहेत. मतदारसंघांचे दौरे करताना त्यांची प्रकृतीही काल (१५ नोव्हेंबर) बिघडली होती. त्यामुळे काही ठिकाणी जाऊन त्यांनी फक्त मतदारांचे आशीर्वाद घेतले. आजही त्यांनी अनेक ठिकाणी भेटी दिल्या अन् भाषण करून मतदारांना मनसेला मतदान करण्याचं आवाहन केलं.

हेही वाचा >> Pankaja Munde : “९० हजार बुथसाठी भाजपाकडून ९० हजार माणसं, त्यामुळे ऑक्सिजन…”, पंकजा मुंडेंचं तुफान भाषण!

सकाळ-संध्याकाळी उठून तेच बोलायचं

राज ठाकरे आज नाशिकच्या सभेत म्हणाले, “सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसती पकपक.. निवडणुका म्हणजे तुम्हाला सांगतो कंटाळवाण्या असतात. कधीतरी भाषण करणं ठीक असतं. पण निवडणुकीत सकाळ, संध्याकाळ तेच बोलायचं”, असं राज ठाकरे म्हणाले.

राज्यात सुरू असलेल्या जातीजातीच्या राजकारणावरून राज ठाकरेंनी मतदारांना आवाहन केलं. ते म्हणाले, “निवडणुका गेल्या तेल लावत. राजकीय पक्ष मेले तरी चालतील. पण महाराष्ट्र जगला पाहिजे. ती काळाची गरज आहे. ही सगळी मंडळी त्यापासून दूर लोटत आहेत. तालुक्यात विकास करू शकलो नाही, उद्योगधंदे करू शकलो नाहीत, यासाठी विष कालवलं जातंय. हे सर्व उद्योग यासाठी सुरू आहेत. आपण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की राजकारण काय सुरू आहे.”

दरम्यान, कालच्या प्रचारसभेत राज ठाकरे यांची भिवंडी येथे प्रकृती बिघडली होती. त्यामुळे त्यांनी तिथे भाषण न करताच निघून गेले. त्यांनी तिथे औषधोपचार घेऊन पुढच्या प्रवासाला निघाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray in nashik speech saying election is a monotonous thing sgk