सोलापूर : राज्यात आगामी विधानभा निवडणुका लढविण्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील सर्व अकरा विधानसभा जागांतून उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी ते स्वतः येत्या रविवारी व सोमवारी सोलापुरात येणार आहेत.

हेही वाचा – पिंपरी-चिंचवड: चिमुकली गिरीजाच्या मृत्यू प्रकरणी ‘त्या’ सोसायटी मालकावर गुन्हा दाखल

हेही वाचा – धर्मेंद्र- हेमामालिनीला न्यायालयाचा दिलासा; मावळातील जमिनीचे खरेदीखत रद्द करण्याचा दावा फेटाळला

रविवारी सायंकाळी राज ठाकरे यांचे आगमन झाल्यानंतर शासकीय विश्रामगृहात ते पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी यांची बैठक घेणार आहेत. रात्री मुक्काम केल्यानंतर सोमवारी ते दिवसभर जिल्ह्यातील सर्व अकरा विधानसभा जागांसाठी उमेदवारांची चाचपणी करणार आहेत. सर्व विधानसभा मतदारसंघांतील पक्षाच्या पदाधिकारी यांच्या बैठकाही घेण्यात येणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ठाकरे हे तुळजापूरमार्गे धाराशिवकडे रवाना होणार आहेत. मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी ठाकरे यांच्या सोलापूर दौऱ्याचे नियोजन झाल्याचे सांगितले.

Story img Loader