अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे गट-भाजपाच्या वतीने मुरजी पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर उद्धव ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके या मैदानात आहेत. दोन्ही बाजूंनी जोमात प्रचार केला जात असताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ही निवडणूक लढवू नये, अशी विनंती केली आहे. या सर्व घडामोडी घडत असताना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला वाटले होते की, ही निवडणूक बिनविरोध होईल. मात्र विरोधी पक्षाचा तसा विचार नाहीये, असे त्या म्हणाल्या आहेत. अंधेरी पूर्व मतदारसंघात प्रचार करताना त्या माध्यम प्रतिनिधींशी बोलत होत्या.

हेही वाचा >> “सरकारमधील मंत्र्यांना सत्तेचा माज,” शिंदे गट-भाजपा सरकारविरोधात अंबादास दानवे आक्रमक

ही निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती. अशा परिस्थितीत विरोधी पक्ष आपला उमेदवार उभा करत नाही. मात्र दुर्दैव म्हणायला हवे ही निवडणूक लढवली पाहिजे असे त्यांना वाटते. विरोधी पक्षाच्या मनात काय आहे, याबाबत मला कल्पना नाही, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी दिली.

हेही वाचा >> मोठी बातमी! अंधेरी पोटनिवडणूक लढवू नका, राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, म्हणाले “रमेश लटकेंच्या आत्म्याला…”

बाळासाहेब ठाकरे यांनी जात, धर्म असा विचार केला नव्हता. ज्याचे देशावर प्रेम आहे तो भारताचा नागरिक आहे आणि तो हिंदुत्ववादी आहे, असे बाळासाहेब म्हणायचे, असेही लटके म्हणाल्या. तसेच मला सर्वांचा पाठिंबा आहे, असा दावा त्यांनी केला.

Story img Loader