Raj Thackeray : विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीच्या आधी सर्वच राजकीय पक्षांनी आतापासून जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यासाठी पदाधिकाऱ्यांच्या बैठका, सभा, मेळावे, विविध मतदारसंघांचे दौरे अशा प्रकारे राजकीय नेतेमंडळींची तयारी सुरू असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. विधानसभेला महाराष्ट्रात प्रामुख्याने महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये सामना रंगणार आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडीसह इतर काही छोट्या पक्षांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महायुती आणि महाविकास आघाडीत असणारे पक्ष किती जागा लढविणार? कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? याबाबत सध्या खलबतं सुरू आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विधानसभा निवडणुकीत काय भूमिका राहणार? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी मुंबईत पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत २२५ ते २५० जागा लढण्याची घोषणा केली. एवढेच नाही, तर मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सत्तेत बसवणारच, असंही राज ठाकरे म्हणाले.

त्यामुळे मनसे विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार हे जवळपास स्पष्ट झालं. मात्र, राज ठाकरे यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत घेतलेली भूमिका आणि आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घेतलेली भूमिका, यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून टीका होत आहे. राज ठाकरे हे त्यांच्या भूमिकेवर ठाम राहत नसल्याची टीका केली जाते. मनसे पक्षाच्या स्थापनेपासून राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या धोरणांमध्ये बदल होत गेल्याचा आरोप अनेकदा केला जातो. या पार्श्वभूमीवरच राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केल्यापासून त्यांनी आजपर्यंत नेमक्या कोणत्या भूमिका घेतल्या? याबाबत जाणून घेऊ…

हेही वाचा : Thackeray Group Vs MNS : उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावरील हल्ल्यानंतर राज ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन; म्हणाले, “तुम्ही हे सगळं…”

मनसेची स्थापना आणि मराठी अस्मितेचा मुद्दा

राज ठाकरे शिवसेनेत असताना प्रमुख नेते होते. त्या वेळच्या शिवसेनेची मुलुखमैदानी तोफ म्हणून राज ठाकरेंकडे पाहिलं जात होतं. राज ठाकरे यांचे एखाद्या मुद्द्यावर असलेले स्पष्ट विचार आणि पक्ष संघटनेवर असलेली पकड यामुळे त्यांच्याकडे भविष्यात सेनेचं नेतृत्व त्यांच्याकडे असेल असं अनेकांना वाटायचं. मात्र, त्यानंतर पक्षांतर्गत राजकारण वाढलं आणि राज ठाकरेंची शिवसेनेत घुसमट वाढत गेली. शिवसेनेची सूत्रं त्यांच्याकडे जाणार अशी चिन्हं होती पण महाबळेश्वरच्या अधिवेशनात एक वेगळं चित्र पाहायला मिळालं होतं. महाबळेश्वरमधील अधिवेशनात राज ठाकरे यांनी पक्षाच्या नेतृत्वासाठी उद्धव ठाकरे यांचं सुचवलं होतं. या सर्व घडामोडीनंतर राज ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हक्कासाठी लढण्याचं जाहीर केलं आणि ९ मार्च २००६ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली.

शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केल्यानंतर राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात एक वाक्य उच्चारलं होतं. “माझा लढा विठ्ठलाशी नाही तर भोवतालच्या बडव्यांशी आहे.” त्यांच्या या एका वाक्यावरून त्यांचा रोख हा उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेतील काही नेत्यांकडे होता? हे स्पष्ट झालं होतं. मनसेची स्थापना केल्यानंतर महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा, असा मनसेच्या तत्त्वांचा मूळ गाभा होता. पक्षाच्या स्थापनेनंतर त्यांनी मराठी अस्मितेच्या मुद्द्याला हात घालत त्यांनी तो जिवंत केला.

उत्तर भारतीयांविरोधात आंदोलन

मराठीचा मुद्दा मनसेच्या स्थापनेपासूनच अजेंड्यावर असल्यानं मनसेच्या वतीनं उत्तर भारतीयांविरोधात अनेक आंदोलनं करण्यात आली. त्यामध्ये उत्तर भारतीय हे महाराष्ट्रात येऊन मराठी माणसांच्या नोकऱ्या बळकावत असल्याचा आरोप सातत्याने करण्यात आला. रेल्वेमध्ये मराठी मुलांना संधी मिळत नाही म्हणून आंदोलन, हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध, उत्तर भारतामधून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांच्या लोंढ्यांना विरोध, मराठी पाट्यांचं आंदोलन, महाराष्ट्रातील दुकानांवर मराठी पाट्या लावण्याची मागणी, अशा अनेक मुद्द्यांवर मनसेनं (MNS) आंदोलनं केली.

हेही वाचा : Thackeray Group Vs MNS : “आज ठाण्याने तुमची वाट पाहिली, यापुढे महाराष्ट्रात…”, मनसे नेत्याचा ठाकरे गटाला इशारा

२००९ मध्ये १३ आमदार निवडून आले

राज ठाकरे यांनी पक्ष स्थापन केल्यानंतर मराठी अस्मितेच्या मुद्दा हा अजेंडा ठेवत पहिल्यांदाच २००९ मध्ये १३ आमदार निवडून आणले. पहिल्याच निवडणुकीत १३ आमदार निवडून आल्यामुळे महाराष्ट्रात एका नव्या राजकीय पक्षाचा उदय झाला. त्यानंतर मुंबई महापालिका, पुणे महापालिका व नाशिक पालिकेत मोठ्या प्रमाणात मनसेचे नगरसेवक निवडून आले होते. मात्र, त्यानंतर झालेल्या जवळपास सर्वच निवडणुकांत मनसेला फारसं यश मिळवता आलेलं नाही. इतकंच काय, तर २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत मनसेची फक्त एकच जागा निवडून आली.

टोल नाक्यांच्या विरोधात आंदोलन

महाराष्ट्रामधील टोल नाके बंद व्हावेत, यासाठी मनसेनं मोठं आंदोलन उभारलं होतं. अव्वाच्या सव्वा टोलवसुली केली जाते. मात्र, जोपर्यंत रस्ते व्यवस्थित होत नाहीत, तोपर्यंत नागरिकांकडून टोलवसुली करू नका, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली होती. मध्ये महाराष्ट्रभर या आंदोलनाला प्रतिसाद मिळाला. या आंदोलनामुळे अनेक टोल नाके बंद झाल्याचा दावा मनसेकडून केला जातो. मात्र, पुढे काही काळानंतर हे आंदोलन शमलं.

हिंदुत्वाचा मुद्दा हाती

मनसेने २०२० मध्ये पक्षाचा झेंडा बदलत एक प्रकारे हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला. कारण- मनसेचा आधीचा झेंडा हा विविध रंगांचा होता. त्यात वर निळा रंग, खाली हिरवा रंग, तर मध्ये या दोन रंगांपेक्षा थोडा मोठा भगवा रंग होता. मात्र, नंतर हा झेंडा बदलत नव्या झेंड्यात संपूर्ण भगवा रंग आणि त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा घेण्यात आली. त्यानंतर मनसे मूळ मराठी आस्मितेच्या मूळ मुद्द्यांपासून हळूहळू दूर गेल्याचं बोललं गेलं.

हेही वाचा : Eknath Shinde : “अ‍ॅक्शनला रिअ‍ॅक्शन…”; उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावरील हल्ल्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सूचक प्रतिक्रिया!

२०१४ ला मोदींना पाठिंबा आणि २०१९ मध्ये ‘लाव रे तो व्हिडीओ’

गुजरातच्या विकासाचं मॉडेल पाहून राज ठाकरे यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला होता. मात्र, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करीत, ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत राज ठाकरे यांनी अनेक सभा गाजवल्या. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मनसे लोकसभेची निवडणूक लढवणार अशी चर्चा होती; पण ऐनवेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली होती. महाराष्ट्रात राज ठाकरे यांनी ‘लाव रे तो व्हिडीओ’च्या अनेक सभा घेतल्या होत्या. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आघाडीबरोबर राज ठाकरे जातील, अशाही चर्चा होत्या. पण २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आणि शिवसेना (आताचा ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (आताचा शरद पवार गट) व काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं. त्यानंतर राज ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसपासून दूर गेले.

महायुतीला बिनशर्त पाठिंबा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २०२४ च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अर्थात महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. त्याबाबत राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. यावेळी ते म्हणाले होते की, लोकसभा, राज्यसभा, विधान परिषद असं काहीही नको; फक्त नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान व्हावेत, त्यांच्यासारखं कणखर नेतृत्व देशाला पुन्हा मिळावं, यासाठी मी पाठिंबा जाहीर करत आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं.

२०२४ ची विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवणार?

२०२४ ची विधानसभा निवडणूक मनसे २२५ ते २५० जागा लढविणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे. तसेच मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सत्तेत बसवणार म्हणजे बसवणार, असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय. मनसे विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार हे जवळपास स्पष्ट झालं. त्यामुळे राज ठाकरे नेमकी महायुती बरोबर आहेत की नाही? हा संभ्रम कार्यकर्त्यांमध्ये कायम आहे. दरम्यान, यावरूनच राज ठाकरे हे त्यांच्या भूमिकेवर ठाम राहत नसल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे.