Raj Thackeray महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या खास अशा आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. राज ठाकरे हे कायमच विरोधकांवर त्यांच्या खास शैलीतून टीका करताना दिसतात. सध्या राज ठाकरे ( Raj Thackeray ) हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणूक जवळ आली आहे त्यादृष्टीने त्यांचा हा दौरा सुरु आहे. या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या ( Raj Thackeray ) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कसं आणि किती यश मिळतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र त्यांच्या प्रवासादरम्यानचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. राज ठाकरे हे त्यांच्या भाषणांदरम्यान अनेक किस्से सांगत असतात. आता महाराष्ट्र दौरा करत असताना त्यांच्याबरोबर असाच एक खास किस्सा घडला आहे जो अनेकांच्या स्मरणात राहिल असाच आहे.

राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर

राज ठाकरे ( Raj Thackeray ) हे त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षातील उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी महाराष्ट्र दौरा करत आहेत. २७ सप्टेंबरपासून राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर होते. त्यानंतर अंबा एक्स्प्रेसने त्यांनी पुढचा प्रवास सुरु केला. राज ठाकरेंच्या प्रवासादरम्यान त्यांना एका चिमुकल्याने भेटण्याची इच्छा व्यक्त केली. महाराष्ट्र नवनिर्माण युवा सेनेने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत राज ठाकरेंनी जो खिलाडुपणा दाखवला त्याची चर्चा होते आहे. राज ठाकरे यांनाही नातू आहे. त्या नातवाला जसं ते खेळवतात त्याचप्रमाणे हा व्हिडीओ चर्चेत आला आहे. कारण या व्हिडीओत राज ठाकरेंच्या ( Raj Thackeray ) मनात असलेल्या आपुलकीचं दर्शन झालं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

हे पण वाचा- Raj Thackeray : लाडकी बहीण योजनेबाबत राज ठाकरेंचं भाष्य, “महिलांना अशाप्रकारे पैसे देणं…”

राज ठाकरेंना चिमुरडा भेटल्यावर काय घडलं?

राज ठाकरे ( Raj Thackeray ) हे ट्रेनने त्यांच्या इच्छित स्थळी चालले होते. त्यावेळी एका चिमुरड्याने त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. राज ठाकरे यांनीही नकार दिला नाही. राज ठाकरेंना पाहून या चिमुरड्या मुलाने आधी नमस्ते केलं आणि त्यानंतर जय महाराष्ट्रची घोषणा केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे राज ठाकरेही त्याला पाहून जय महाराष्ट्र म्हणाले आणि त्याला ट्रेनच्या दारापर्यंत निरोप द्यायलाही आले. ट्रेनच्या दारावर राज ठाकरे उभे असतानाही हा चिमुकला त्यांच्याकडे पाहात होता आणि हात उंचावून त्यांना जय महाराष्ट्र म्हणाला. राज ठाकरे आणि या चिमुरड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण युवासेनेने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरलही झाला आहे. तसंच अनेकांनी हा व्हिडीओ रिपोस्टही केला आहे.