गेल्या दोन दिवसांपासून आमदार संजय शिरसाट यांनी खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून राजकीय वातावरण तापलं आहे. प्रियंका चतुर्वेदी यांची सुंदरता पाहून आदित्य ठाकरे यांनी त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली, असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटल्याचा दावा संजय शिरसाट यांनी केला होता. यानंतर शिरसाट यांच्यावर चौफेर टीका करण्यात येत आहे. मनसेनेही शिरसाट यांना लक्ष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“महाशक्तीने मुकुट चढविलेलं हे ‘शीर’ विकृत विचारांचं ‘माठं’ आहे,” असा हल्लाबोल मनसेनं ट्वीट करत केला आहे.

ट्वीटमध्ये मनसेने म्हटलं की, “महाशक्तीने मुकुट चढविलेलं हे ‘शीर’ विकृत विचारांचं ‘माठ’ आहे! प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे, ‘महिलांबद्दलचा जितका आदर मनात साठवीत जाल, तितके शिवराय तुमच्यावर अधिक प्रसन्न होत जातील…’ त्याच प्रबोधनकार ठाकरेंच्या सुपुत्राचे म्हणजेच स्व. बाळासाहेबांचे नाव घेऊन राजकारण करायचं आणि महाशक्ती पाठीशी आहे, म्हणून महिलांबद्दलची वाट्टेल ती विधानं करायची. हे महाराष्ट्रात खपवून घेतलं जाणार नाही… अशांचं ‘शीर’ नेत्यांनी जाग्यावर आणावे. अन्यथा ते ‘शीर’ विकृत विचारांचं ‘माठ’ आहे असं महाराष्ट्रात प्रचलित होईल.”

हेही वाचा : संजय शिरसाटांच्या ‘त्या’ दाव्यावर केदार दिघे संतापले; म्हणाले, “मंत्रीपदाची भीक…”

चंद्रकांत खैरेंचं शिरसाटांवर टीकास्र

“काहीतरी बोलत राहायचं, हे संजय शिरसाट यांचं काम आहे. संजय शिरसाट मुंबईत कुठे, कोणत्या क्लब आणि डान्सबारमध्ये जातात, हे सर्व जगाला माहिती आहे. शिरसाटांच्या वक्तव्यामुळे एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा मलिन होत आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे एकनिष्ठ आहोत. कधीही ‘मातोश्री’शी गद्दारी करणार नाही. लावा-लाव्या करत मला उद्धव ठाकरे यांच्यापासून बाजूला करण्याचा डाव या मूर्ख माणसाचा आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केली आहे.