Raj Thackeray Uttar Sabha Thane Live Updates : राज ठाकरेंनी मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यामधून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं होतं. आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांवर त्यांनी तोंडसुख घेतलं. शरद पवारांवर देखील त्यांनी निशाणा साधला होता. तसेच, या सभेतून त्यांनी मशिदींवरील भोंगे न काढल्यास त्यांच्यासमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावण्याचं आवाहन केलं होतं. या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपाला फायदेशीर भूमिका घेतलीये का? मनसे भाजपाची बी टीम आहे का? अशी टीका केली जाऊ लागली होती.
या सर्व मुद्द्यांना राज ठाकरे आज उत्तर देणार असल्यामुळेच या सभेला ‘उत्तरसभा’ असं नाव मनसेकडून देण्यात आलं आहे.
ते दुसरे जंत पाटील म्हणतात, “हे कधी उत्तर प्रदेशात गेले होते ज्यांना आता उत्तर प्रदेशचं कौतुक वाटतं”… माझं भाषण नीट ऐका. मी म्हटलं होतं ज्या बातम्या येतायत, त्यानुसार उत्तर प्रदेशचा विकास झाला असेल, तर त्याचा मला आनंद आहे.
अजित पवारांकडे रेड पडते. त्यांच्या सख्ख्या बहिणींकडे रेड पडते. त्यानंतरही शरद पवार आणि नरेंद्र मोदींचे अत्यंत मधुर संबंध राहतात. कसे? मी कधी बघितलं नाही शरद पवारांना भडकलेले. मी उघडपणे बोलत होतो, तेव्हा या सगळ्यांच्या शेपट्या आत होत्या.
भाषणानंतर काही प्रतिक्रिया आल्या. सुप्रिया सुळे म्हणतात, लाव रे तो व्हिडीओ म्हणणारे एका नोटिशीने बदलतील याचं मला आश्चर्य वाटतं. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की एकाच घरात राहून अजित पवारांच्या घरी रेड पडते, पण तुमच्या घरी रेड पडत नाही याचं कारण मला कळेल का? महाराष्ट्रात एक माणूस पोहोचवला की पवार साहेब मोदींची भेट घेतात, पुढचा माणूस सांगायला. देशमुख गेले, मग परत एक भेट घेतली. अजितचं काय? मग रेड टाकल्या. त्यानंतर परत भेट घेतली, नवाब मलिक फाजीलपणा करतोय. मग नवाब मलिक. नंतर आता संजय राऊतांवर बोलले असं म्हणे. आत काय बोलले माहीत नाही. मी त्यांच्या वाढदिवसाच्या भाषणात बोललो होतो की शरद पवार खूश झाले म्हणजे भीती वाटायला लागते. आज शरद पवार संजय राऊतांवर खूश आहेत. कधी टांगलेला दिसेल कळणारही नाही. यात अनेक काँग्रेसवाले गेलेत. मग उशिरा समजतं की तेव्हा ते बोलले होते, ते आज लागलंय.
उद्या मला एखादी गोष्ट नाही पटली, तर परत विरोध करेन. पण उगाच विनाकारण भाषणाला उभे राहिलेत, टीका करा असं नाही करणार. आता तुम्ही शेण खाल्लंय, आता तुमच्यावर टीका करणार.
आजही माझं मोदींना सांगणं आहे. दोन मागण्या पूर्ण करा, खूप मोठे उपकार होतील. एक तर देशात समान नागरी कायदा आणा आणि दुसरं देशातल्या लोकसंख्येवर नियंत्रण आणता येईल असा कायदा आणा. आम्हाला आसूया नाही की आमच्याकडे एक आणि तुमच्याकडे पाच-पाच. पण ज्याप्रकारे लोकसंख्या वाढतेय, हा देश एक दिवस फुटेल. या काही गोष्टी देशात होणं गरजेचं आहे. आवश्यक आहेत.
मोदींसारखा पंतप्रधान या देशाला मिळावा, असं म्हणणारा पहिला माणूस मी होतो. त्यानंतर बाकीचे बोललेत. मी एखादं स्वप्न एका पंतप्रधानाकडून पाहतो. ३० वर्षांनंतर एका व्यक्तीला पूर्ण बहुमत मिळाल्यावर ज्या गोष्टी व्हायला हव्या होत्या त्याबाबत मी एका भाषणातही बोललो होतो.
मी उघडपणे मोदींच्या भूमिकांविषयी बोललो. पण काश्मीरमधलं ३७० कलम त्यांनी रद्द केलं, तेव्हा अभिनंदन करणारं पहिलं ट्वीट माझं होतं.
मला तेव्हा मोदींच्या काही भूमिका नाही पटल्या. तेव्हा मी उघडपणे बोललो. आता हे म्हणतायत, मला ईडीची नोटीस आली म्हणून मी ट्रॅक बदलला. मला नाही गरज ट्रॅक बदलायची. आयएलएफएस कंपनीची चौकशी होती, कोहिनूरची, त्यातून मी एका वर्षात बाहेर पडलो होतो. म्हणजे कुणी व्यवसायही करायचा नाही का? त्यासंदर्भात मला ईडीची नोटीस आली होती. त्यानंतर मी ईडीच्या कार्यालयात गेलो. शरद पवारांना फक्त ईडीची नोटीस येतेय अशी चाहूल लागली होती. त्यावरून केवढं नाटक केलं. आणि या हातांनी काही पापच केलं नाही, तर नोटीस राजकीय असो की कुणाचीही असो, मी त्याला भीक घालत नाही.
गुढी पाडव्याच्या सभेला येताना अनेक पत्रकार स्वत:चा एक चित्रपट घेऊन आले होते. नरेंद्र मोदींवरही राज ठाकरे बोलतील. मी नाही बोललो. परत तशी वेळ आली तर बोलेन. इतरही विषय आहेत. तुमचेही वाभाडे मला काढायचे आहेत. गेल्या निवडणुकीच्या वेळी भाजपा-शिवसेनेकडे बहुमत आल्यानंतरही तुम्ही मतदारांशी प्रतारणा केली. त्याआधी पाहाटेचा शपथविधी झाला. तो फिसकटला. मग यांचं सरकार बनलं. या दोन्ही गोष्टींवर मी बोलल्यावर भाजपाची स्क्रिप्ट कुठून आली? ते विसरले होते, मी फक्त आठवण करून दिली.
माझे मित्र आशुतोष गोवारीकर यांचा लगान चित्रपट आला. त्यानंतर स्वदेस आला. मी तो पाहायला गेलो. मला त्याने बोलावलं होतं. मी तो चित्रपट पाहिल्यानंतर आशुतोषला म्हटलं अरे काय चित्रपट बनवला? असा काही चित्रपट असतो का? हे बोलून मी घरी आलो आणि विचार केला मी खरंच चित्रपट पाहिला का? की माझ्यामागे लगान चित्रपट होता? मी स्वदेस पाहायला गेलो, तेव्हा माझा एक चित्रपट डोक्यात घेऊन गेलो होतो. मी पुन्हा तो चित्रपट पाहिल्यानंतर आशुतोश गोवारीकरला म्हटलं मला माफ कर. मी तो चित्रपट व्यवस्थित पाहिला नव्हता – राज ठाकरे
त्या दिवशीची सभा झाल्यानंतर अनेक राजकीय पक्षांशी संबंधित पत्रकारांनी आपापला कंडू शमवून घेतला. मग वाट्टेल ते बोललं गेलं. भाजपाची स्क्रिप्ट होती वगैरे. महाराष्ट्रात अनेक गुणी पत्रकार या भामट्या पत्रकारांमुळे एकटे पडलेत.
गुढीपाडव्याच्या सभेनंतर अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जे तारे तोडले, ते पाहिल्यावर मला वाटलं याचं उत्तर तर दिलं पाहिजे. पण मला पत्रकार परिषदेत याचं उत्तर द्यायचं नव्हतं. कारण मी जर पत्रकार परिषद घेतली असती तर या सगळ्या पक्षांना बांधील जे पत्रकार आहेत, तेही त्यात शिरतात आणि मूळ विषय बाजूला राहून हे भलतीकडेच विषय भरकटवतात. – राज ठाकरे
व्यासपीठावर येताना मला अग्निशम दलाचा बंब दिसला. पण मी इतकी काही आगा लावणार नाहीये. आज दुपारी मी बसलो असताना एका पोलीस अधिकाऱ्याचा फोन आला. त्यांनी मला सांगितलं किती वाजता निघणार आहात? म्हटलं का? तर म्हणे काही संघटना तुमचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करणार आहेत. आम्ही त्यांना ताब्यात वगैरे घेऊ. मी म्हटलं निघेन तेव्हा कळवतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या ताफ्याला कुणीतरी अडवणार आहे, हे इंटेलिजन्सला कळलं, पण पवारांच्या घरी एसटीचे लोक जाणार आहेत, हे इंटेलिजन्सला नाही कळलं. खरंतर त्यांना प्रत्येक गोष्ट माहिती असते – राज ठाकरे
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधू-भगिनींनो आणि मातांनो… माझा आज भाषण करताना कदाचित टेबलफॅन होणार आहे – राज ठाकरे
राज ठाकरे ठाण्यात सभेच्या ठिकाणी पोहोचले, थोड्याच वेळात तोफ धडाडणार!
संजय राऊतांच्या दोन-चार फायली भाजपावाल्यांनी काढल्या नाहीत, तर त्यांनी महाराष्ट्रात येऊन सगळा गोंधळ घातला. – प्रकाश महाजन
नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता होती, तेव्हा राज ठाकरेंनी माझी जात न बघता मला तिथे सभागृह नेता केलं. राज ठाकरे त्यावरही थांबले नाहीत. नाशिक महानगर पालिकेची स्थायी समितीचं सभापती देखील मला केलं. गटनेता केलं. ते कधीही मुसलमानांच्या विरोधात नव्हते, यापुढेही राहणार नाही. – सलीम शेख
राज ठाकरे यांच्या सभेमुळे कोर्टनाका, जांभळीनाका आणि तलावपाली परिसरात वाहतूक कोंडी…
गेल्या ४-५ दिवसांत राज्यातल्या प्रत्येक पक्षानं मला ऑफर दिली. जर राज ठाकरेंना एकहाती सत्ता दिली, तर आपल्या लोकांना अमेरिकेतून ऑफर येतील – वसंत मोरे
मला चंद्रकांत पाटील म्हणाले, तुम्ही भाजपात या, नगरसेवक व्हाल. मी त्यांना म्हणालो, १५ वर्ष भाजपाच्याच नगरसेवकांना पाडून नगरसेवक होत आहोत – वसंत मोरे
गेल्या दोन-तीन महिन्यांत राज ठाकरेंच्या प्रकृतीत अडचणी सुरू आहेत. राज ठाकरे एवढा त्रास होत असताना सर्व कार्यकर्ते-शाखाध्यक्षांच्या घरी जात होते. जर ते या गोष्टी करतात, तर आपण काय काम करतो? राज ठाकरेंनी ब्लू प्रिंट आणली, ती आपण लोकांपर्यंत किती पोहोचवली? त्यावर मनसेच्या दोन नगरसेवकांनी कात्रजमध्ये काम करून दाखवलं आहे – वसंत मोरे
सरकारनं करायची कामं मनसेनं केली. आमचा साईनाथ ५-५ हजार लोकांना जेवण पुरवत होता. मी स्वत: दवाखाने उभे केले – वसंत मोरे
करोनाच्या काळात पुण्यात एक अॅम्बेसिडर फुटली आणि त्याचा आवाज सगळ्या महाराष्ट्रानं ऐकला – वसंत मोरे
संपलेल्या पक्षावर हे लोक पत्रकार परिषदा घेत आहेत, प्रश्न उभे करत आहेत. तसं तर वाटत नाही की त्यांनी संपलेल्या पक्षासाठी हे सगळं करायला हवं – शालिनी ठाकरे
मला निमंत्रणाची गरज नाही. साहेबांनी काल सांगितलं होतं की तू ठाण्याला ये. माझ्या घरचा आज कार्यक्रम आहे. पण आधी लगीन कोंढाण्याचं. त्यामुळे मी आज ठाण्याला जातोय. सभेचं नावच उत्तर सभा आहे. माझ्या मोठ्या भावाच्या मुलाच्या लग्नाची घरी गडबड आहे. पण साहेबांनी मला यायला सांगितलं आहे. त्यामुळे मी आलोय. – वसंत मोरे
जम्मूमध्ये देखील राज ठाकरेंच्या सभेचं प्रक्षेपण केलं जाणार असून त्यासंदर्भात शालिनी ठाकरे यांनी ट्विटरवर माहिती दिली आहे.
खूप लोकांना तळतळ, मळमळ होत होती. त्यांचा इलाज आज होणार आहे. सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज मिळणार आहेत, म्हणून ही 'उत्तर सभा' आहे – संदीप देशपांडे
उत्तर प्रदेश, बिहार, काश्मीरमधूनही सभेसाठी कार्यकर्ते हजर…!
उत्तर प्रदेशमधून विमानाने राज ठाकरेंच्या ठाण्यातील सभेसाठी येणार लोक- अविनाश जाधव https://t.co/WHX18AwV4T < येथे वाचा सविस्तर वृत्त #Thane #RajThackeray #MNS #AvinashJadhav @RajThackeray @mnsadhikrut @avinash_mns pic.twitter.com/MmJFEiO98b
— LoksattaLive (@LoksattaLive) April 12, 2022
विक्रोळी-घाटकोपरदरम्यान काही काळ कार्यकर्त्यांसाठी गाडी थांबवल्यानंतर राज ठाकरे ठाण्याच्या दिशेने रवाना…