Raj Thackeray News : जागतिक व्यंगचित्र दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सव २०२३ चे उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. राज ठाकरे यांनी सर्व व्यंगचित्र पाहून कलाकार मंडळींचे कौतुक केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी राज ठाकरे यांच्याकडे व्यंगचित्र काढण्याचा आग्रह केला. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं व्यंगचित्रही काढलं. उद्घाटनाला कार्टुन्सट कम्बाईनचे अध्यक्ष संजय मिस्त्री, युवा संवाद सामाजिक संस्थेचे अध्यक्ष धनराज गरड उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यातही व्यंगचित्रकार दडलेला आहे. गेले काही वर्षे त्यांनी त्यांची व्यंगचित्र प्रसिद्ध केली नसली तरीही त्याआधी अनेकांनी त्यांनी रेखाडलेली व्यंगचित्र संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आहेत. मला सोशल मीडियावर व्यंगचित्र शेअर करायला आवडत नाहीत, असंही त्यांनी एका कार्यक्रमात जाहिररित्या सांगितलं होतं. आज पुण्यात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी वेळ आणि बैठक मिळत नसल्याने व्यंगचित्र काढत नसल्याची खंत बोलून दाखवली.

हेही वाचा >> Video: राज ठाकरेंनी अजित पवारांचे काढले व्यंगचित्र; “अजित पवार आता..”, असे म्हणताच उपस्थितांमध्ये पिकला हशा

“मी व्यंगचित्र पाहत होतो, फार अप्रतिम व्यंगचित्र आहेत. हे व्यंगचित्र पाहताना आणि नेहमीच माझा हात रोज शिवशिवतो. परंतु, ज्याप्रकारची बैठक आणि शांतता पाहिजे ती मिळत नसल्याने, वेळ मिळत नसल्याने हल्ली व्यंगचित्र काढत नाही.पण बऱ्याचदा माझ्या भाषणातून व्यंगचित्र बाहेर पडतात”, असं राज ठाकरे म्हणाले.

“मला एका कार्यक्रमात विचारलं की राजकारण, की व्यंगचित्र. तेव्हा मी व्यंगचित्र असं सांगितलं. कारण मी व्यंगचित्रात, कलेत रमणारा माणूस आहे. कला तुम्हाला जे दाखवू शकते ते विलक्षण असतं”, असंही ते पुढे म्हणाले.

टोलवरून मिश्किल टिप्पणी

माझी रत्नागिरीत उद्या सभा आहे. मी जाणार होतो पुण्यातून, पण त्यांनी मध्येच टोल भरावा लागला, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray on his cartoons art in pune program sgk