जनतेने आगामी प्रत्येक निवडणुकांमध्ये चुकीच्या पद्धतीने राजकारण करत समाजाला गृहीत व वेठीस धरणाऱ्यांना योग्य तो धडा शिकवावा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केले.

कोकण दौऱ्यावरील राज ठाकरे यांनी गुरुवारी पाटण तालुक्यातून जाताना कोयनानगर येथे  स्थानिक पदाधिकारी आणि मनसे  कार्यकर्त्यांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर, अनिल शिदोरे, राज्य वाहतूक सेना उपाध्यक्ष रवींद्र शेलार, जिल्हाध्यक्ष ॲड. विकास पवार आदी या वेळी उपस्थित होते.

Uddhav Thackeray on Pankaja Munde
Uddhav Thackeray: “पंकजाताई मुंडे तुझे धन्यवाद…”, उद्धव ठाकरेंनी केलं कौतुक; म्हणाले, ‘तुम्ही महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी काढली’
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
What Uddhav Thackeray Said About Raj Thackeray ?
Uddhav Thackeray : “राज ठाकरेंशी युती करणं शक्यच नाही, महाराष्ट्र द्रोही..”, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
raj thackeray latest news
काँग्रेसबरोबर युती करण्यावरून राज ठाकरेंची पुन्हा उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले, “मी, माझा स्वार्थ, माझी खुर्ची अन्…”
Raj Thackeray On Ramesh Wanjale
Raj Thackeray : “रमेश वांजळे शेवटचं माझ्याशी बोलले”, राज ठाकरेंनी सांगितली आठवण; म्हणाले, “अनेक जण सोडून गेले, पण…”
raj thackeray on shivaji park light cut,
पंतप्रधान मोदींच्या सभेपूर्वी शिवतीर्थावरील दीपोत्सवाचे कंदील काढल्याने राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, “हिंदुत्त्ववादी विचारांचे…”
What Raj Thackeray Said?
Raj Thackeray : ‘सत्तेत जायचा फॉर्म्युला काय?’ राज ठाकरे म्हणाले, “या निवडणुकीत..”

राज ठाकरे म्हणाले, सध्या राज्यात  सुरू असलेली राजकीय परिस्थिती व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आगामी राजकीय वाटचालीसाठी आवश्यक त्या उपाययोजना व प्रयत्न सुरू आहेत. पाटण तालुका आणि प्रामुख्याने कोयना विभागातील निसर्ग साधन संपदेचा पर्यटन व्यवसायासाठी अधिकाधिक वापर व्हावा. पर्यटनपूरक प्रकल्प राबवण्यासाठी राज्य व केंद्र शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी. जेणेकरून स्थानिकांना रोजगार, व्यवसाय उपलब्ध होईल आणि पर्यटकांसाठी नवनवीन पर्यटनस्थळे उपलब्ध होतील अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.