जनतेने आगामी प्रत्येक निवडणुकांमध्ये चुकीच्या पद्धतीने राजकारण करत समाजाला गृहीत व वेठीस धरणाऱ्यांना योग्य तो धडा शिकवावा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केले.
कोकण दौऱ्यावरील राज ठाकरे यांनी गुरुवारी पाटण तालुक्यातून जाताना कोयनानगर येथे स्थानिक पदाधिकारी आणि मनसे कार्यकर्त्यांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर, अनिल शिदोरे, राज्य वाहतूक सेना उपाध्यक्ष रवींद्र शेलार, जिल्हाध्यक्ष ॲड. विकास पवार आदी या वेळी उपस्थित होते.
राज ठाकरे म्हणाले, सध्या राज्यात सुरू असलेली राजकीय परिस्थिती व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आगामी राजकीय वाटचालीसाठी आवश्यक त्या उपाययोजना व प्रयत्न सुरू आहेत. पाटण तालुका आणि प्रामुख्याने कोयना विभागातील निसर्ग साधन संपदेचा पर्यटन व्यवसायासाठी अधिकाधिक वापर व्हावा. पर्यटनपूरक प्रकल्प राबवण्यासाठी राज्य व केंद्र शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी. जेणेकरून स्थानिकांना रोजगार, व्यवसाय उपलब्ध होईल आणि पर्यटकांसाठी नवनवीन पर्यटनस्थळे उपलब्ध होतील अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.