Raj Thackeray on Ladki Bahin Yojana Update : महाराष्ट्र सरकारने यंदाच्या पावसाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजना महिलांकरता अंमलात आणली. या योजनेला २ कोटींहून अधिक महिलांनी लाभ घेतला असून यासाठी ४६ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, आतापर्यंत सरकारने या योजनेअंतर्गत पाच हप्ते पात्र महिलांच्या खात्यावर पाठवले आहे. आता आचारसंहिता लागल्याने महिला आणि बालविकास मंत्रालयात या योजनेसाठी निधी थांबवण्यात आला आहे. दरम्यान, यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली आहे. ते एबीपी माझाच्या माझा व्हिजन कार्यक्रमात बोलत होते.

लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरे सातत्याने सरकारवर टीका करत आहेत. त्यांनी यापूर्वीही अनेकदा या योजनेविरोधात सरकारला धारेवर धरलं होतं. आता पुन्हा एकदा त्यांनी सरकारवर निशाणा साधला. लाडकी बहीण योजनेबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले, “ज्याचा काही थांगपत्ता लागू शकत नाही अशी निवडणूक पहिल्यांदाच मी पाहतोय. त्यामुळे आता ते काय करणार आहेत हे माहीत नाही. माझं इतकंच म्हणणं आहे की कोणतीही गोष्ट फुकट देऊ नये. कारण कोणीही फुकट मागत नसतं. महाराष्ट्रातील भगिनींना सक्षम बनवा, त्यांच्यासाठी उद्योगधंदे आणा. त्यांच्याकडे त्यांच्या मेहनतीचे पैसे येऊ देत. त्या कुठे सांगतात मेहनतीशिवाय पैसे द्या. तुम्ही देताय म्हणून घेत आहेत. त्यांना लाचार बनवताय. फुकट गोष्टी देऊन त्यांना लाचा बनवतोय. आपण चुकीचं करतोय.”

MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Amit Thackeray on Eknath Shinde
Amit Thackeray : “धनुष्यबाण आणि पक्षनाव घेऊन एकनाथ शिंदेंनी चूक केली”, शिवसेनेतील बंडखोरीवरील अमित ठाकरेंची प्रतिक्रिया चर्चेत!
raj thackeray on amit thackeray
अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणाऱ्या शिंदे गट व ठाकरे गटाला राज ठाकरे म्हणाले…
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले, “मला एक उदाहरण दाखवा की…”
Maharashtra assembly elections 2024
इडीने छळले. सत्तेशी जुळले, धन फळफळले
devendra fadnavis reaction on harshwardhan patil about join ncp sharad pawar group
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: “आर. आर. आबा आता हयात नाहीत, पण एवढंच सांगतो की…”, देवेंद्र फडणवीसांचं अजित पवारांच्या दाव्यावर उत्तर!
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?
raj thackeray on amit thackeray (1)
राज ठाकरे यांनी अमित ठाकरेंना काय सांगितलं? (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

“उद्या तरुणांना पैसे द्यायला सुरुवात केलीत ते म्हणतील आता मला काम करण्याची गरजच नाही. पैसे मिळाल्यावर तरुण काहीही करेल. तो ड्रग्स घेईल. माझं असं मत आहे की सरकारचं काम आहे की त्यांच्या हाताला काम देणं. शेतकरी कुठे मोफत वीज मागतोय. फक्त त्यात सातत्य ठेवा. थोडी कमी किंमतीत द्या”, असंही राज ठाकरे म्हणाले.

हेही वाचा >> अमित ठाकरेंचा निवडणूक लढवण्याचा निर्णय, राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया काय होती? स्वत: सांगितला ‘तो’ प्रसंग!

महाराष्ट्र दिवाळखोरीला लागेल

“फुकट देण्याकरता एक-दोन महिना पैसा पुरेल. त्यासाठी कुठून तरी पैसे काढाल. पण नंतर महाराष्ट्र दिवाळखोरीला लागेल. महाराष्ट्र कंगाल होईल. या फुकटच्या योजनांमुळे एक लाख कोटीचं कर्ज होईल. आपण अजूनही कर्ज वाढवतोय. अशाने सरकार चालणार नाही”, असंही राज ठाकरे म्हणाले.

कोणाचं सरकार बनेल?

“निवडणुकीच्या निकालानंतर कोणाचं सरकार बनेल असं राज ठाकरेंना विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले, “सरकार युतीचं बनेल. तीन महिन्यांपूर्वी वाटत होतं की आघाडीचं पारडं जड आहे. पण हरियाणाच्या निकालांनंतर आता तसं वाटत नाही. अर्थात ही निवडणूक युतीला तितकी सोपीही नाही”, असंही राज ठाकरे म्हणाले.