Raj Thackeray on Amit Thackeray First Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. मुंबईतील माहीम मतदारसंघाची सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. गेल्या निवडणुकीत वरळीतून उभं राहात आदित्य ठाकरे हे निवडणूक लढवणारे पहिले ठाकरे ठरले होते. आता त्यांच्यापाठोपाठ राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हेदेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून मनसेनं त्यांना माहीम मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. मात्र, त्यांच्यासमोर उमेदवार उभा न करण्यावरून महायुतीमध्ये सध्या चर्चा सुरू आहे, तर ठाकरे गटानं उमेदवार दिला आहे. याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पहिल्यांदाच सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

माहीममध्ये काय आहे राजकीय स्थिती?

माहीममध्ये सदा सरवणकर विद्यमान आमदार असून शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षानं त्यांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे. मात्र, राज ठाकरेंनी अमित ठाकरेंना उमेदवारी दिल्यानंतर सरवणकर यांच्यावर उमेदवारी मागे घेण्यासंदर्भात पक्षाकडून व भाजपाकडून दबाव टाकला जात असल्याचं बोललं जात आहे. सरवणकर मात्र निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. दुसरीकडे शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षानं महेश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. २०१९ च्या निवडणुकीवेळी आदित्य ठाकरे यांच्याविरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय राज ठाकरेंनी जाहीर केला होता. यंदा मात्र उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला आहे.

Kalyan East candidates, Kalyan West candidates,
कल्याण पूर्व, पश्चिमेतील ठाकरे गटाचे उमेदवार ठरले, शिंदे शिवसेनेचे ठरेना
Daily Horoscope On 30 October
३० ऑक्टोबर पंचांग: दिवाळीआधीच येईल सोनेरी संधी, आर्थिक…
Zeeshan Siddique slams Uddhav Thackeray
झिशान सिद्दिकींच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी दिला उमेदवार; खोचक पोस्टमध्ये म्हणाले, “सुना है पुराने दोस्तों ने…”
sadanand tharwal left uddhav shiv sena in dombivli
ठाकरे गटाचे डोंबिवलीतील सदानंद थरवळ यांचा शिवसेनेला रामराम
Maharashtra elections
अमित ठाकरेंविरोधात शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून महेश सावंत यांना उमदेवारी; माहीममध्ये होणार तिरंगी लढतं!
sanjay raut on dadar mahim amit thackeray
Sanjay Raut : अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार का? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “जर…”
MNS Second List Announced
MNS List : मनसेने जाहीर केली उमेदवारांची यादी, अमित ठाकरे माहीममधून, तर वरळीतून आदित्य ठाकरेंना ‘हा’ उमेदवार देणार आव्हान
Chandrasekhar Bawankule critisize Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे यांची स्थिती शोले चित्रपटातील जेलरसारखी…

अमित ठाकरेंविरोधात उमेदवार, राज ठाकरे म्हणतात…

अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देऊ नये, असं भाजपा सांगत असूनही सदा सरवणकर मात्र निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. दुसरीकडे आदित्य ठाकरेंवेळी राज ठाकरेंनी जे केलं, ते अमित ठाकरेंवेळी उद्धव ठाकरेंनी केलं नसल्याची बाब अधोरेखित होत आहे. त्यावर राज ठाकरेंनी एबीपी माझाच्या कार्यक्रमात सविस्तर भाष्य केलं आहे.

Raj Thackeray: महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…

“मी आदित्यसाठी विचार केला होता की माझ्याविरोधातला पक्ष असला तरी राजकारण आणि नातेसंबंध हे मी वेगळं बघतो. मी लहानपणापासून त्या विचारात वाढलोय. मला तेव्हा असं वाटलं की वरळीत आदित्यच्या समोर उमेदवार नको उभा करूयात. हा माझा विचार झाला. मी जसा विचार करतोय, तसा सूज्ञ समोरचाही विचार करेलच अशी मी अपेक्षा नाही धरत. मी ती गोष्ट चांगल्या विचारानं केली. समोरच्याला तसं वाटलं तर त्यांनी करावी, नाहीतर करू नये”, असं राज ठाकरे म्हणाले.

“आदित्यविरोधात उमेदवार न देण्याबाबत मला कुणीही सांगितलं नव्हतं”

“मी जेव्हा उमेदवार द्यायचा नाही असं ठरवलं, तेव्हा कुणाला फोन करून सांगितलं नव्हतं. मी कुणाशीही फोनवर याबाबत काही बोललो नव्हतं. मला असं करायला कुणी सांगितलंही नव्हतं. गेल्या निवडणुकीत आदित्यची उमेदवारी जाहीर झाली हे मला माहितीही नव्हतं. जेव्हा ते जाहीर झालं, तेव्हा मला वाटलं की तिथे उमेदवार देऊ नये. त्यानुसार मी ती गोष्ट केली. त्याचं मला वाईटही वाटत नाही. मला त्याच्याशी काहीही देणंघेणं नाही. हा प्रत्येकाच्या स्वभावाचा भाग झाला”, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

“भाजपाला हे समजतं, पण इतरांना समजेल असं नाही”

दरम्यान, यावेळी राज ठाकरेंनी भारतीय जनता पक्षाचाही उल्लेख केला. “भाजपाला ही गोष्ट समजू शकते. पण सगळ्याच पक्षांना हे समजेल असं नाही. प्रत्येक पक्षाकडून ओरबाडण्याचे प्रयत्न चालू असतात. त्यांचं त्यांना ओरबाडू देत. आपण किती, कुणाला आणि काय काय सांगायला जायचं?” असंही ते म्हणाले.

यावेळी राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीवेळी घडलेला प्रकार सांगितला. दक्षिण मुंबईतून त्यांचा उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावर लढवण्याची ऑफर त्यांना आल्यानंतर त्यांनी ती नाकारल्याचं जाहीर केलं होतं. त्यावर त्यांनी भाष्य केलं. “दक्षिण मध्य मुंबईत आम्ही सांगितलं की ही जागा तुम्हाला लागणार नाही. पण हे सांगून हट्टापायी जागा पाडायच्या असतील, तर पाडून घ्या जागा. आम्ही ती जागा लढली असती, तर १०० टक्के चित्र वेगळं दिसलं असतं. पण त्यानंतर तुम्ही मला सांगताय की उमेदवारानं आमच्या निशाणीवर निवडणूक लढवली पाहिजे. मी कमावलेली निशाणी आहे. ढापलेली निशाणी नाहीये. इतक्या वर्षांच्या निवडणुकीच्या प्रवासात मला मिळालेली निशाणी आहे. लोकांच्या मतदानातून आलेली निशाणी आहे. कोर्टातून आलेली निशाणी नाहीये”, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.