Raj Thackeray on Maharashtra Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खालल्यानंतर राज ठाकरेंनी एक्सद्वारे केवळ तीन शब्दांत प्रतिक्रिया दिली होती. “अविश्वसनीय.. तुर्तास इतकेच”, असं म्हणत त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालाविषयीची नाराजी उघड केली होती. निकाल लागून आता जवळपास दहा दिवस झाले तरी राज ठाकरे कुठेही व्यक्त झाले नव्हते. दरम्यान, आज त्यांनी क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मारक उद्घाटनावेळी निकालाविषयीची खदखद अगदी थोडक्यात बोलून दाखवली.

“रमाकांत आचेरकर यांचं स्मारक याच्याआधीच व्हायला हवं होतं. आचरेकर सरांनी जेवढे खेळाडू भारतासाठी तयार केले तेवढ्या इतर कोणत्या कोचने केले असतील, असं मला वाटत नाही. खरंतर रस्ते, फ्लायओव्हरसाठी अशा लोकांची नावे दिली पाहिजेत. आज क्रिकेट जसं बदललं. तसं सगळ्याच गोष्टी बदलल्या. आजही नवीन मुलं सांगतात की आम्हाला सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळींसारखं खेळता येत नाही”, असं राज ठाकरे म्हणाले.

Sudhir Tambe On Balasaheb Thorat
Sudhir Tambe : बाळासाहेब थोरातांबाबत सुधीर तांबेंचं मोठं विधान; म्हणाले, “भाजपात गेले असते तर आज…”
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Sachin Tendulkar Meets Vinod Kambli
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli : सचिन भेटायला आला पण विनोद कांबळीला उभंही राहता आलं नाही, मैत्रीतला ‘तो’ क्षण राज ठाकरेही पाहातच राहिले!
Girgaon Marathi Marwari Conflict
“इथे मराठीत न बोलता..”, गिरगावमध्ये मराठी भाषेच्या गळचेपीवर भाजपा आमदार मंगल प्रभात लोढांची मोठी प्रतिक्रिया
Marathi Marwadi conflict in Mumbai
Marwadi vs Marathi Conflict : “मुंबईत भाजपाची सत्ता, मारवाडीतच बोलायचं”, मराठी महिलेला दुकानदाराची दमदाटी; मनसेचं खळखट्याक!
Ramdas Athawale on Eknath Shinde
Eknath Shinde : मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपा हायकमांडने एकनाथ शिंदेंना काय सांगितले? रामदास आठवले म्हणाले…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…

हेही वाचा >> Marwadi vs Marathi Conflict : “मुंबईत भाजपाची सत्ता, मारवाडीतच बोलायचं”, मराठी महिलेला दुकानदाराची दमदाटी; मनसेचं खळखट्याक!


“तुमच्याकडे क्रिकेट बदलत गेलं, तसं आमच्याकडे राजकारण बदलत गेलं. तुमच्याकडे अम्पायरने आऊट दिल्यावर थर्ड अम्पायर असतो. गेल्या निवडणुकीत आम्हाला थर्ड अम्पायर दिला असता तर निर्णय बदलले असते, वेगळे दिसले असते”, अशी खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली.

राज ठाकरेंचं अद्यापही मौनच!

राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत १२८ उमेदवार उभे केले होते. अमित ठाकरेही यंदा माहीम विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. राज ठाकरेंनी अनेक उमेदवारांकरता जोरदार सभा घेतल्या. त्यांच्या सभांना तुफान गर्दीही झाली होती. अमित ठाकरेंनी तर घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला होता. त्यामुळे यंदा मनसेच्या पारड्यात काही जागा पडतील, अशी आशा व्यक्ती केली गेली. परंतु, निवडणूक निकालाच्या दिवशी मनसेचा सुपडा साफ झाल्याचं स्पष्ट झालं. २०१९ च्या निवडणुकीत मनसेला निदान एक जागा तरी मिळाली होती. परंतु, २०२४ ला मनसेला एकही जागा मिळवता आली नाही. तेव्हापासून राज ठाकरेंनी मौन पाळलं होतं. मधल्या काळात मनसेच्या अनेक नेत्यांनी ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. पण राज ठाकरेंनी अद्यापही या निकालावर खुलेपणाने संवाद साधलेला नाही.