पुण्यातील कल्याणी नगर भागात एका अल्पवयीन मुलानं मद्यधुंद अवस्थेत पोर्श कार चालवून दोघांना चिरडल्याची घटना घडली होती. या अपघातात अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला होता. या घटनेला आता जवळपास एक महिन्यांच्या वर कालावधी उलटून गेला आहे. मात्र, या प्रकरणाची अद्यापही चर्चा सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही संताप व्यक्त केला आहे.

राज ठाकरे यांनी नुकताच अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाला मुलाखत दिली. या मुलाखतीत राज ठाकरे यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी पुण्यातील अपघात प्रकरणावर संताप व्यक्त करत त्यांनी व्यवस्थेबाबतचा रागही व्यक्त केला.

navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
devendra fadnavis analysis
“आपण तीन नाही, तर चार पक्षांशी लढत होतो, तो चौथा पक्ष म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांकडून लोकसभेतील निकालाचं विश्लेषण!
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
Sharad Pawar and Ajit Pawar
अजित पवारांसाठी परतीचे दार बंद झाले का? शरद पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले, “सवाल…”
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
sharad pawar marathi news (1)
अजित पवारांच्या ‘मी नवखा नाही’ विधानावर शरद पवारांचं खोचक भाष्य; म्हणाले, “खिशात ७० रुपये असताना…”!
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!

हेही वाचा – “…अन् मी घाबरून तिथून पळ काढला”; राज ठाकरेंनी सांगितला ३१ डिसेंबरच्या रात्रीचा ‘तो’ किस्सा!

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?

“पुण्यात एका मुलाने पोर्श गाडीने दोन मुलांना धडक दिली. या अपघातात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर माध्यमांत त्या मुलाचे बाबा, आई, आजोबा सर्वांची चर्चा झाली. मात्र, या अपघातात ज्या दोघांचा मृत्यू झाला, त्यांच्याबाबात कोणीही बोलत नाही. कोणत्याही वृत्तावाहिनीवर त्यांची किंवा त्यांच्या आईवडिलांची चर्चा होताना दिसत नाही”, अशी संतप्त प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली.

“ज्यावेळी ही घटना घडली आणि हे प्रकरण न्यायालयात गेलं. तेव्हा न्यायाधीश त्या मुलाला ३०० शब्दांचा निबंध लिहायला सांगतात, हे कोणते न्यायाधीश आहेत? हे सगळं उगाच घडत नाही. पैशांची देवाण घेवाण झाल्याशिवाय या गोष्टी घडू शकत नाही”, असेही राज ठाकरे म्हणाले. तसेच “अशा घटना घडत असतील तर विश्वास कुणावर ठेवायचा, पोलिसांवर, प्रशासनावर, न्यायालयांवर की राजकीय नेत्यांवर? या सगळ्यांवरून जर लोकांना विश्वास उडाला, तर आपण अराजकतेकडे जाऊ”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

पुण्यात नेमकी काय घटना घडली होती?

एका बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत ताशी ११० किमीच्या वेगाने पोर्श कार चालवत अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांना धडक दिली होती. ही धडक इतकी जोरात होती की अश्विनीचा जागीच मृत्यू झाला. तर अनिशला रुग्णालयात नेण्यात आलं पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं होतं. अनिश अवधिया हा २४ वर्षांचा तरुण होता. पुण्यात त्याने इंजिनिअरिंग केलं होतं. तसंच मागच्या काही वर्षांपासून आयटी विभागात काम करत होता. तर अश्विनी कोस्टा त्याची मैत्रीण होती. दोघेही एकाच कंपनीत काम करत होते. मित्रांसह डिनरला गेले होते. हे दोघे बाईकवरुन निघाले त्यानंतर काही सेकंदातच भरधाव वेगात आलेल्या पोर्शने या दोघांना धडक दिली. ज्यात या दोघांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा- “लावा म्हणावं…”, राज ठाकरेंची बांबू शब्दावरून संजय राऊतांनी केलेल्या विधानावर मिश्किल टिप्पणी!

या अपघाताच्या तपासादरम्यान अनेक धक्कादायक माहिती समोर येत गेली होती. हा अपघात घडल्यानंतर पोर्श या गाडीतील ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप झाला होता. तसेच हा अपघात घडला त्यानंतर आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली होती. त्यानंतर आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयाच्या दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, या सर्व प्रकऱणाचा अद्याप तपास सुरु आहे.