Raj Thackeray महाराष्ट्रात निवडणुकीला अवघे काही दिवस उरले आहेत. प्रचारसभांना जोर आला आहे. २० नोव्हेंबरला निवडणूक आणि २३ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनीही त्यांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. राज ठाकरे यांनी वरळीत दुसऱ्यांदा सभा घेतली आणि त्यांनी उद्धव ठाकरे तसंच शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली.

quiziframe id=67 dheight=282px mheight=417px]

raj thackeray latest news
काँग्रेसबरोबर युती करण्यावरून राज ठाकरेंची पुन्हा उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले, “मी, माझा स्वार्थ, माझी खुर्ची अन्…”
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Raj Thackeray Criticized Sharad Pawar Again
Raj Thackeray : राज ठाकरेंची बोचरी टीका, “शरद पवार हे तालुक्याचे नेते, जाणते राजे वगैरे..”
raj thackeray criticized uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंच्या हातून पैसा सुटत नाही, बॅगेत काय असणार?” राज ठाकरेंची खोचक टीका!
What Raj Thackeray Said?
Raj Thackeray : राज ठाकरेंची बोचरी टीका, “उद्धव ठाकरेंकडून बाण गेला आणि फक्त खान राहिले आहेत, कारण..”
Amit Thackeray Raj Thackeray
Raj Thackeray : “ती बातमी आली अन्…”, राज ठाकरेंनी सांगितली अमित ठाकरेंना निवडणुकीला उभं करण्यामागचं कारण
Uddhav Thackeray Raj Thackeray
“राज ठाकरे भाषण करून गेले तिथे अडरवर्ल्डच्या मदतीने…”, ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप; म्हणाले, “अनेक मतदारसंघांत गुंडांच्या टोळ्यांना…”
Raj Thackeray Slams Uddhav Thackeray in his Speech
Raj Thackeray : राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका, “बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते माझ्या शिवसेनेची काँग्रेस होताना दिसली तर..”

काही लोकांचा रडूबाई रडू शो सुरु आहे

काही लोकांचा रडूबाई रडूबाई शो सुरु आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तपासलं तर तपासलं. त्यात काय? मलाही तपासलं. ज्याच्या हातून पैसे सुटत नाहीत त्याच्या बॅगेत सापडतील का? निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनाही हे कळत नाही. सारखं मला मारत आहेत अरे कशासाठी? असं म्हणत राज ठाकरेंनी ( Raj Thackeray ) उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा टोला लगावला आहे.

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री होण्यासाठी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली-राज ठाकरे

बाळासाहेब ठाकरेंची संपूर्ण हयात गेली काँग्रेसला विरोध करण्यात. पण स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी शिवसेना उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली याला म्हणतात भूमिका बदलणं. मी कधीही माझ्या स्वार्थासाठी भूमिका बदलेली नाही असं राज ठाकरे ( Raj Thackeray ) वरळी या ठिकाणी म्हणाले. मला ज्या गोष्टी पटल्या नाहीत त्यांच्या विरोधातही मी बोललो.

हे पण वाचा- Raj Thackeray : “माझा मुलगा रुग्णालयात असताना हा माणूस विकला गेला”, राज ठाकरेंकडून सात वर्षांनी मनातली खदखद व्यक्त

मी भूमिका बदलली नाही, जे पटलं नाही त्याला विरोध दर्शवला-राज ठाकरे

२०१९ मध्ये मी मोदींना विरोध दर्शवला होता. कारण अनेक गोष्टी ज्या व्हायला नको होत्या त्या घडल्या. २०१४ ते २०१९ मध्ये महागाई वाढली, नोटबंदी झाली, सिलिंडर महाग झाला या आणि अशा अनेक गोष्टींमुळे मी मोदींना विरोध दर्शवला होता. मात्र २०१९ नंतर अनेक गोष्टी चांगल्याही झाल्या. कलम ३७० हटवलं गेलं. अनेक कारसेवकांचा बळी गेला होता शरयू नदीमध्ये मात्र मोदींनी रामाचं मंदिर उभं राहिलं. कारसेवकांच्या आत्म्यांना शांती मिळाली ती राम मंदिर उभं राहिल्यानंतर. इतक्या वर्षांचा प्रलंबित प्रश्न सुटला तर अभिनंदन करायचं नाही का? माझा कुठलाही स्वार्थ त्यामागे नव्हता असंही राज ठाकरे ( Raj Thackeray ) म्हणाले.

शरद पवारांची हयात भूमिका बदलण्यात गेली-राज ठाकरे

तुमचा स्वार्थ नसताना, चांगल्याला चांगलं म्हणणं आणि वाईटला वाईट म्हणणं याला भूमिका बदलणं म्हणत नाहीत. शरद पवारांबाबत तर बोलायलाच नको. त्यांचं आयुष्य तर भूमिका बदलण्यातच गेलं. काँग्रेसच्या जिवावर मुख्यमंत्री झाले. त्यानंतर पुलोद स्थापन करुन मुख्यमंत्री झाले. १९८६ मध्ये परत काँग्रेसमध्ये गेले. १९८८ ला मुख्यमंत्री झाले. १९९१ ला संरक्षण मंत्री झाले. १९९९ ला पुन्हा त्याच सोनिया गांधी ज्यांच्यासह ते काँग्रेसमध्ये होते त्यांना विदेशी बाई म्हणत वेगळे झाले. निवडणूक वेगळी लढवली ती संपल्यानंतर पुन्हा काँग्रेसमध्ये गेले. याला भूमिका बदलणं म्हणतात. आत्तापर्यंत मनसेने किती भूमिका बदलल्या काढून बघा. मी कुठलंही पद पदरात पाडून घेण्यासाठी भूमिका बदलली नाही असंही राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे कोणत्या मित्रासाठी प्रकल्पांना विरोध करतात?

राजकारणाचा खेळ करुन ठेवला आहे. याचं कारण तुम्ही रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात खोलात जाऊन बघत नाही, विचार करत नाही, म्हणून या सगळ्या गोष्टी घडतात. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, “आपल्या कोकणात एक अणू उर्जा प्रकल्प येणार होता. या प्रकल्पाला उद्धव ठाकरेंनी विरोध केला होता. मग तो अणू उर्जा प्रकल्प गेला किंवा काम थंड झालं. हा प्रकल्प आला तर कोकणात भूकंप झाला, त्सुनामी आली तर किती हाहाकार होईल अशी टीका झाली होती. अणू उर्जा प्रकल्पाला विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरेंना कल्पना नाही का? मुंबई हे सर्वाधिक लोकसंख्या असलेलं शहर आहे. या ठिकाणी भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर उभं आहे. १९५९ किंवा १९६० ला ते बांधण्यात आलं आहे. त्यामध्ये न्यूक्लिअर रिअॅक्टर आहे. जर शहराच्या मध्यात ते आहे तर कोकणातला प्रकल्प बंद करायचा म्हणून कुठल्या उद्योगपतीने तुम्हाला सांगितलं होतं? कारण विरोध करतात तेव्हा कुठला तरी उद्योगपती मागे असतोच. ” असं राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी म्हटलं आहे.

नाणारचा प्रकल्प येणार होता, त्या प्रकल्पालाही उद्धव ठाकरेंनी विरोध केला. त्यांच्या परिचयाचे कोण असे लोक आहेत ज्यांची ऑईल रिफायनरी आहे? ज्यांच्या लग्नांमध्ये ते जातात? अजून एक ऑईल रिफायनरी आली तर आपला मित्र तोट्यात जाईल तो जाऊ नये म्हणून कोकणातल्या रिफायनरीला विरोध झाला. यामागे राजकारण असतं आणि ते आर्थिक राजकारण असतं हे लक्षात घ्या असंही राज ठाकरे ( Raj Thackeray ) म्हणाले.