संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ सोलापूर येथे संभाजी आरमार या संघटनेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. या वेळी संभाजी आरमारच्या कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. या प्रकरणी पोलिसांनी २५ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बुधवारी फेसबुकवर जनतेशी थेट संवाद साधला होता. या वेळी नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देताना त्यांनी संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा दावा संभाजी आरमारच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. सोलापूर शहरातील जुना पुणे नाका येथील संभाजी महाराज चौकात संघटनेचे कार्यकर्ते जमा झाले व त्यांनी राज ठाकरे यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यास सुरूवात केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. या वेळी फौजदार चावडी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
सोलापुरात संभाजी आरमारकडून राज ठाकरेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
या प्रकरणी पोलिसांनी २५ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
आणखी वाचा
First published on: 12-01-2017 at 14:34 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray sambhaji armar solapur dummy image ignite