राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्या महिन्यात मोठी फूट पडली. पक्षातील वरिष्ठ नेते अजित पवार हे अनेक आमदारांना बरोबर घेऊन महायुतीत सहभागी झाले. आपणच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा दावा करत अजित पवार आणि त्यांचा गट राज्य सरकारमध्ये सहभागी झाला. त्यामुळे भाजपाशी हातमिळवणी का केलीत? शरद पवारांशी बंडखोरी का केलीत? असे प्रश्न सातत्याने अजित पवार आणि त्यांच्या गटातील आमदारांना विचारले गेले. त्यावर प्रत्येक वेळी अजित पवार गटाने “आम्ही महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी सत्तेत सहभागी झालो आहोत” असं सांगितलं आहे. अजित पवार आणि त्यांच्या गटातील आमदारांच्या या वक्तव्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजित पवार गटाला टोला लगावला आहे.

पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके सभागृहात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयोजित केलेल्या मुंबई गोवा महामार्गासाठीच्या निर्धार मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपासह राष्ट्रवादीच्या अजित पवार गटावर जोरदार टीका केली. तसेच राज ठाकरे यांनी अजित पवार यांची नक्कलही केली.

Eknath shinde 170 seats mahayuti
विधानसभा निवडणुकीत महायुतीला १७० हून अधिक जागा मिळाल्याशिवाय राहणार नाहीत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Rahul Gandhi Amravati
“पंतप्रधान मोदींना स्मृतीभ्रंश झालाय, ते आजकाल…”; अमरावतीतल्या सभेतून राहुल गांधींचा हल्लाबोल!
Rahul Gandhi Amravati
Rahul Gandhi: “अदानींसाठीच भाजपने आमचे सरकार पाडले”, राहुल गांधी यांचा आरोप
Narendra Modi Kharghar, Narendra Modi latest news,
पंतप्रधानांच्या आगमनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत सरकारची स्वच्छ खारघर मोहीम सुरूच
Sharad Pawar on Gautam Adani meeting
Sharad Pawar: “होय, बैठक झाली होती, पण…”, NCP-BJP एकत्र येण्यासाठी अदाणींच्या घरी बैठक; अजित पवारांच्या दाव्यावर शरद पवार म्हणाले…
Roads Kharghar, Narendra Modi meeting,
पंतप्रधानांच्या सभेमुळे खारघरचे रस्ते चकाचक
What Eknath Shinde Said?
Eknath Shinde : ‘महायुतीला किती जागा मिळतील?’ एकनाथ शिंदे म्हणाले, “आम्ही…”

राज ठाकरे म्हणाले, अजित पवारांना विचारलं की आपण या सरकारमध्ये का आलात? त्यावर ते म्हणाले “महाराष्ट्राचा विकास करायला आलोय”. अरे कशाला खोटं बोलताय. ६ दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी काढली ना तुमची… पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, महाराष्ट्रात ७० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. मग हे सगळेजण टुणकन इथे (भाजपाबरोबर) आले. कारण, छगन भुजबळांनी अजित पवारांना सांगितलं असणार. आत (तुरुंगात) काय काय असतं? जाऊ नका… आपण हवं तर इथे (भाजपाबरोबर) जाऊ पण तिथे (तुरुंगात) नको.

हे ही वाचा >> टोलनाकाफोडीवरून अमित ठाकरेंवर टीका करणाऱ्या भाजपाला राज ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…

मुंबई गोवा महामार्ग गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे. या काळात समृद्धी महामार्ग बनून वाहतुकीसाठी खुलाही झाला, मात्र, मुंबई-गोवा महामार्गाचं काम अर्धेही झालेलं नाही. मुंबई गोवा महामार्गासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सातत्याने आवाज उठवला आहे. आता मनसेने या महामार्गासाठी आंदोलनाची हाक दिली आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या मागणीसाठी मनसेने निर्धार मेळावा आयोजित केला होता. यावेळी राज ठाकरे बोलत होते.