राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ३ मे रोजी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. या राजीनाम्याला पक्षातील कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून जोरदार विरोध झाला. त्यानंतर शरद पवार यांनी काल (५ मे) त्यांचा राजीनामा मागे घेतला. शरद पवारांनी राजरीनामा मागे घेतल्यानंतर वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. प्रत्येकजण आपल्या परीने या घटनेमागच्या कारणांचा अंदाज लावू पाहतोय. अनेक नेत्यांनी यावर भाष्य केलं. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही वेळापूर्वी या सर्व घटनांना ‘राजीनामा नाट्य’ म्हटलं आहे.

दमानिया यांच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील शरद पवारांच्या राजीनामा नाट्यावर भाष्य केलं. राज ठाकरे आज सध्या रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. रत्नागिरीत त्यांची मोठी जाहीर सभा सुरू आहे. या सभेच्या सुरुवातीलाच त्यांनी पवारांच्या राजीनामा नाट्याचा उल्लेख केला. राज ठाकरे म्हणाले. मला असं वाटतं, शरद पवारांना खरंच राजीनामा द्यायचा होता. परंतु अजित पवार त्या दिवशी जे वागले ते पाहून शरद पवारांनी त्यांचा राजीनामा मागे घेतला.

Sanjay Raut Answer to Amit Shah
Sanjay Raut : संजय राऊत यांचं अमित शाह यांना उत्तर, “उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आणि…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Devendra Fadnavis and Sharad Pawar (1)
Sharad Pawar : बीडप्रकरणी शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन; म्हणाले, “राजकारणात मतभेद असतील-नसतील, पण…”
Supriya Sule
Supriya Sule : महापालिका निवडणुकीबाबतच्या ठाकरे गटाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंचं रोखठोक मत; म्हणाल्या, “या निवडणुका…”
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
Devendra Fadnavis On Raj Thackeray or Uddhav Thackeray
Devendra Fadnavis : राज ठाकरे की उद्धव ठाकरे? देवेंद्र फडणवीसांनी दिलं राजकीय उत्तर; म्हणाले, “राजकारणात काहीही…”
What Aditya Thackeray Said?
Aditya Thackeray : “…तर आम्हीही देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करु”, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर असं का म्हणाले आदित्य ठाकरे?
Sanjay Raut On Municipal Corporation election
Sanjay Raut : मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढणार? संजय राऊतांचं मोठं भाष्य; म्हणाले, “दिल्लीत जे घडलं तेच…”

राज ठाकरे म्हणाले, अजित पवार त्या दिवशी जसं वागत होते, ते पाहून शरद पवारांनी त्यांचा निर्णय बदलला असावा. राजीनामा दिला त्या दिवशी अजित पवार कार्यकर्त्यांशी कसे वागले ते आपण पाहिलं. ए तू गप्प बस, ए तू शांत बस, कार्यकर्त्यांच्या हातातला माईक घे, असं सगळं त्यांचं सुरू होतं. हे सगळं पवार साहेबांच्या डोळ्यादेखत सुरू होतं. हे सर्व पाहताना पवार साहेबांच्या मनात आलं असणार. अरे आत्ताच तर मी राजीनामा दिलाय आणि हा माणूस (अजित पवाह) असा वागतोय. खरंच जर राजीनामा देऊन टाकला तर हा माणूस उद्या मला पण म्हणेल ए गप्प बस. त्या भितीपोटी, या भितीपाई त्यांनी राजीनामा मागे घेतला. जेणेकरून नंतर कसलीही भानगड नको.

हे ही वाचा >> “अजित पवार शांत बसणार नाहीत, येत्या काही दिवसात…”, अंजली दमानियांचा मोठा दावा

राज ठाकरे म्हणाले, शरद पवारांना वाटलं असेल हा (अजित पवार) आत्ता असं वागतोय पुढे कसा वागेल. अजित पवारांना त्यावेळी जवळपास आतून उकळ्या फुटत होत्या. जे होतंय ते बरं होतंय असंच त्यांना वाटत होतं.

Story img Loader