जे खोके खोके ओरडत त्यांच्याकडे कंटेनर आहेत असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. प्रत्येक वेळी यायचं आणि बाळासाहेब ठाकरेंचं नाव घ्यायचं आणि तुम्हाला इमोशनल करतायचं. आज हे जे ओरडत आहेत ना खोके खोके त्यांच्याकडे कंटेनर्स आहेत. कोविड पण त्यांनी सोडला नाही. हेच तुमच्याकडे येणार निवडणुकीच्या तोंडावर आणि कुणालातरी दाखवणार. प्रत्येक वेळी यायचं बाळासाहेबांचं नाव घ्यायचं आणि तुम्हाला इमोशनल करायचं हेच सुरु आहे असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. पनवेलमध्ये मनसेचा मेळावा आयोजित करण्यात आहे त्यात बोलत असताना राज ठाकरेंनी हे शरसंधान केलं आहेत.
हे पण वाचा- “…अन् अजित पवार टुणकन तिकडे गेले”; राज ठाकरेंचा टोला, म्हणाले, “पंतप्रधानांनी…”
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर जेव्हा भाजपासह जात सत्ता स्थापन केली तेव्हापासूनच त्यांना गद्दार म्हटलं जातं आहे आणि त्यांचा उल्लेख ५० खोके एकदम ओके असा केला जातो आहे. या घोषणेला जन्म दिला तो उद्धव ठाकरे गटानेच. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार असताना तिन्ही पक्षातले नेतेही हीच घोषणा देत होते. मात्र आज राज ठाकरेंनी पनवेलमधल्या सभेत यावरुन उद्धव ठाकरेंवर टीका केली. तसंच ५० खोके एकदम ओके म्हणणाऱ्यांकडे कंटेनर्स आहेत असंही वक्तव्य केलं.
पुण्यात मी अनेकदा सभा घेऊन सांगतिलं आहे. मुंबई बरबाद व्हायला एक मोठा काळ गेला आहे. मात्र पुणे बरबाद व्हायचं असेल तर फार वेळ लागणार नाही. मी मागच्या २५ वर्षांपासून हे सांगतो आहे असंही राज ठाकरे म्हणाले. कारण कुठलीही आखणी केलेली नाही. आमच्याकडे टाऊन प्लानिंग नावाची गोष्टच नाही फक्त डेव्हलपमेंट प्लान येतो. पुण्याचा अंदाज घ्या, तुम्हाला लक्षात येईल तिथे गुदमरलेला मराठी माणूस आहे. कोकणातही कुणीही येतंय जमिनी घेतं आहे.
हे पण वाचा- टोलनाकाफोडीवरून अमित ठाकरेंवर टीका करणाऱ्या भाजपाला राज ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले, “त्यांनी आधी…”
२०२०-२०२१ ला कलम ३७० कलम हटवलं, या कलमानंतर काश्मीरमध्ये जमीन घेता येते. जा जमीन घ्या. मात्र अंबानी, अदाणी यांनीही अजून तिथे जामीन घेतलेली नाही. मणिपूर किंवा ईशान्यकडच्या राज्यांमध्ये जमीन घेता येत नाही. या सगळ्याचा परिणाम महाराष्ट्राला भोगावा लागतो आहे असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. कारण महाराष्ट्रात सगळे येऊ शकतात. इथे कुठलाही तसा कायदा नाही. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगळे कायदे आहेत. त्याचे दुष्परिणाम आपण सहन करतो आहोत असंही राज ठाकरे म्हणाले.