राज ठाकरेंनी आज गुढी पाडवा मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली. आज राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांनी आपण शिवसेना प्रमुख वगैरे काहीही होणार नाही हेदेखील स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे मी स्वार्थाचं राजकारण केलं नाही असं राज ठाकरे म्हणाले.

मला शिवसेना पक्षप्रमुख व्हायचं असतं तर

अमित शाह यांच्या भेटीनंतर काही होत नाही त्यांना लक्षात आलं. मग मला असे वाटतेचा एपिसोड कसा पुढे न्यायचा? मग राज ठाकरे शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख होणार. अरे व्हायचं असतं तर तेव्हाच झालो असतो. माझ्या घरी ३२ आमदार, सहा सात खासदार एकत्र बाहेर पडू वगैरे ठरलं होतं. मी नावं घेत नाही. मी त्यांना सांगितलं मला पक्ष फोडून काहीही करायचं नाही. माझ्या मनात विचार नाही. पण मी पाऊल उचललं तर स्वतःचा राजकीय पक्ष काढेन. ही गोष्ट मी माझ्या मनाशी खुणगाठ बांधली होती. बाळासाहेब ठाकरेंशिवाय यांच्याशिवाय कुणाच्याही हाताखाली काम करणार नाही. तरीही एकाला संधी दिली होती. पण त्याला काही कळलंच नाही असा टोला राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना लगावला. मी महाराष्ट्र निर्माण सेना हे अपत्य जन्माला घातलं आहे. मी याच पक्षाचा प्रमुख राहणार असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

Sadhguru disheartened over Parliament disruptions on adani issue
Sadhguru on Adani: ‘उद्योगपतींवरून संसदेत रणकंदन नको’, अदाणींना समर्थन देत सद्गुरुंनी व्यक्त केली नाराजी
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Rahul narvekar
विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule : “उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर…”, चंद्रशेखर बावनकुळे यांचं खुलं आव्हान
Rahul Narvekar
Rahul Narvekar : शिवसेना, राष्ट्रवादी व्हाया भाजपा, सर्वात कमी वयाचे विधानसभाध्यक्ष; राहुल नार्वेकरांची राजकीय कारकीर्द कशी आहे?
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “दाढी कुरवाळण्याच्या नादात जे काही पाप केले…” हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका

मी विश्वास टाकला तर टोकाचं प्रेम करतो

“मी जर एखाद्यावर विश्वास टाकला तर मी टोकाचं प्रेम करतो. तर राग आला तर मी टोकाचा विरोध करतो. पण जेव्हा चांगल्या गोष्टी मोदींनी केल्या तेव्हा मी अभिनंदनही केलं. गेल्या पाच वर्षांत ज्या चांगल्या गोष्टी घडल्या त्याचं स्वागत केलं आहे. जी गोष्ट योग्य ती अयोग्य ही माझी भूमिका आहे असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. अमिताभ बच्चन यांनी एका प्रांताचा विचार केला तेव्हा मी त्यांच्यावर टीका केली. मी व्यक्तिगत टीका केली नव्हती, भूमिकेला विरोध केला होता.”

उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका

“आज उद्धव ठाकरे आणि संजय राऊत ज्या प्रकारची टीका नरेंद्र मोदींवर आणि भाजपावर करत आहेत, तशी माझी टीका नव्हती. मला काही नको होतं. मला मुख्यमंत्रिपद मिळालं नाही म्हणून मी विरोध केला नाही. मला भूमिका पटली नाही म्हणून मी विरोध केला. आज हे विरोधात बोलत आहेत. जेव्हा मी बोलत होतो तेव्हा खिशातले राजीनामे काढून माझ्याबरोबर का आला नाहीत? त्यावेळी सत्तेतून मिळणारा मलिदा चाटत बसले होते ना? आज यांना या गोष्टी सुचत आहेत. याचं कारण तुमचा पक्ष फुटला म्हणून आणि तुम्हाला सत्तेतून हाकलवलं म्हणून. तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही या गोष्टी केल्या. मी भूमिका पटली नाही म्हणून विरोध केला. मला त्याच्या बदल्यात काही हवं होतं म्हणून विरोध केला नाही” असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली.

Story img Loader