सध्या आपल्या नव्या राजकीय भूमिकेमुळे चर्चेत असणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे काही दिवसांपूर्वी आजोबा झाले. ५ एप्रिल २०२२ रोजी राज यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि सूनबाई मिताली अमित ठाकरे यांना पुत्ररत्न प्राप्ती झालीय. मनसेचे सचिव सचिन मोरे यांनी फेसबुकवरुन यासंदर्भातील माहिती दिली होती. त्यानंतर राज ठाकरेंच्या नातवाचे नाव काय आहे?, तसेच राज ठाकरेंच्या नातवाचे नाव काय ठेवले जाईल, असे अनेक प्रश्न सोशल मीडियावर विचारण्यात येत होते. सचिन मोरे यांनी त्यांच्या फेसबूक अकाऊंटवरून राज ठाकरेंच्या नातवाचे नाव सांगितले आहे. ‘किआन अमित ठाकरे’ असे त्यांच्या नातवाचे नाव आहे.
काय आहे किआन नावाचा अर्थ?
‘prokerala.com’ या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, किआन हे हिंदू नाव आहे. हे संस्कृत नाव असून देवाची कृपा असा त्याचा अर्थ आहे. ‘dvaita.org’ या वेबसाईटनुसार हे विष्णू देवाचं नावं आहे, तर देवाची एक झलक असाही त्याचा अर्थ आहे.
आणखी वाचा : एसएस राजामौली यांना मराठमोळ्या ‘धर्मवीर’ची भुरळ, टीझर पाहताच म्हणाले…
आणखी वाचा : “हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असा माझा गैरसमज…”, भाषेच्या वादावर जावेद जाफरीचे परखड मत
अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचे २०१९ साली लग्न झाले. त्यांच्या भव्य लग्नसोहळ्यात प्रतिष्ठित नेते, ज्येष्ठ राजकीय मंडळी आणि याशिवाय बॉलिवूड-मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी उपस्थिती दर्शवली होती. लग्नानंतर अमित ठाकरे यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आहे.